लालू प्रसाद यांना सगळे सोडून जाऊ लागले, तीन मुलींनीही घर सोडले

लालू प्रसाद यांना सगळे सोडून जाऊ लागले, तीन मुलींनीही घर सोडले

लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य हिने केलेल्या घणाघाती पोस्टनंतरआणि कुटुंबाशी सगळी नाती तोडल्याच्या घोषणेनंतर, लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील तणाव रविवारी आणखी वाढला. हे कुटुंब फुटण्याच्या मार्गावर आहे. रविवारी लालू प्रसाद यादव यांच्या राजलक्ष्मी, रागिणी आणि चंदा या तीन कन्या आपल्या मुलांसह पटना येथील निवासस्थान सोडून दिल्लीत गेल्या. यामुळे बिहारच्या सर्वात प्रभावशाली राजकीय कुटुंबातील मतभेद वेगाने वाढत असल्याचे संकेत मिळाले.

या तीन बहिणींनी हे पाऊल अशा वेळी उचलले जेव्हा आरजेडी पक्षाला बिहार विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव सहन करावा लागला असून, पक्षाची जागा संख्या ७५ वरून अंदाजे २५ वर आली आहे.

रोहिणीचे आरोप : ‘माझ्यावर अत्याचार झाले’

आरजेडीच्या धक्कादायक पराभवानंतर काही तासांतच, सिंगापूरमध्ये राहणारी डॉक्टर रोहिणी आचार्य यांनी राजकारण आणि कुटुंब दोन्ही सोडत असल्याची घोषणा केली. भावनिक पोस्ट्सच्या मालिकेत तिने सांगितले की, तिच्यावर अश्लील शिवीगाळ झाली आणि एका प्रसंगात तर कोणीतरी तिला चपलेने मारण्याचाही प्रयत्न केला. हा वाद तेजस्वी यादवचे दोन निकटचे सहकारी राज्यसभा खासदार संजय यादव आणि त्यांचे सहकारी रमीझ यांच्याशी संबंधित होता.

रोहिणीने लिहिले की ती “कुटुंबापासून एकटी पडली आहे. तिने वडिलांना किडनी दान केल्यानंतर “कोट्यवधी रुपये घेतलेत” असा अपमानजनक आरोप तिच्यावर केला गेला. एका दुसऱ्या पोस्टमध्ये तिने म्हटले, “ही सर्व कामे मला संजय यादव आणि रमीझ यांनी करायला सांगितली, आणि आता मी सर्व दोष स्वतःवर घेत आहे.”

अद्याप या दोन्ही सहकाऱ्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही, ज्यामुळे तेजस्वी यादवभोवती निर्माण झालेल्या सत्तासंघर्षाबद्दलची वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. रोहिणी, जी गेल्या वर्षी सहारण लोकसभा मतदारसंघातून लढली मात्र तिला पराभव पत्करावा लागला. तिला कुटुंबाची भावनिक आधारस्तंभ मानले जात होते. तिचे अचानक राजकारणातून आणि कुटुंबातून दूर जाणे, यामुळे लालू यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

तीन बहिणी घर सोडून निघाल्या

या पार्श्वभूमीवर, राजलक्ष्मी, रागिणी आणि चंदा यांनी सोमवार सकाळी चुपचाप १० सर्क्युलर रोडवरील घर सोडले. सूत्रांनी सांगितले की, मागील दोन दिवसांत घडलेल्या घटनांमुळे त्या अत्यंत व्यथित होत्या. आता त्या घरात फक्त लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि मीसा भारती राहिले आहेत. तेजस्वी यादव, ज्यांच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या सल्लागारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, ते सार्वजनिक जीवनापासून अंतर ठेवून आहेत.

हे ही वाचा:

कोडीन फॉस्फेटयुक्त प्रतिबंधित कफ सिरपचे अवैध सप्लाय

पंतप्रधान मोदी यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाची केली पाहणी

विषारी सापांपासून संरक्षणासाठी भारत, श्रीलंकेची सेना करतेय अभ्यास

दोन शार्प शूटर्सनी केला अहिल्यानगरातील बिबट्याचा खात्मा

तेजप्रतापचा संताप

रोहिणीच्या आरोपांवर तिचा मोठा भाऊ तेजप्रताप यादवने तीव्र प्रतिक्रिया दिली. तेजप्रतापला यावर्षी पक्ष आणि कुटुंब दोन्हीतून हाकलण्यात आले.

जशनशक्ती जनता दलच्या सोशल मीडिया अकाउंटवरून प्रकाशित केलेल्या संदेशात तेजप्रताप म्हणाला की या घटनेने त्यांचे “हृदय हेलावले”. स्वतःवरचे अनेक हल्ले सहन केले, पण बहिणीचा अपमान “अत्यंत असह्य” असल्याचे तो म्हणाला.

तो म्हणाला, “या अन्यायाचे परिणाम भयंकर असतील. बाबा, तुम्ही फक्त एक इशारा द्या, आणि बिहारची जनता या जयचंदांना जमिनीत पुरून टाकेल. पक्षातील “काही चेहरे” तेजस्वीच्या निर्णयांची माती करत असल्याचा आरोप केला आणि ही लढाई “मुलीच्या सन्मानाची आणि बिहारच्या स्वाभिमानाची आहे” असे घोषित केले.

तेजप्रतापचा हकालपट्टीचा परिणाम

तेजप्रतापच्या वादग्रस्त फेसबुक पोस्टमुळे यावर्षी त्यांना आरजेडीतून काढण्यात आले होते. त्या पोस्टमध्ये त्यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत आणि चालू असलेल्या घटस्फोट प्रकरणाबाबत प्रश्न निर्माण झाले. त्यानंतर त्यांनी जशनशक्ती जनता दल (JJD) स्थापन करून महुआ मतदारसंघातून निवडणूक लढवली, पण तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

त्यांचे घरापासून दूर राहणे आणि आता रोहिणीचेही दूर जाणे — या गोष्टी कुटुंबातील खोलवर गेलेल्या मतभेदांचे स्पष्ट दर्शन घडवतात.

कुटुंबाचा परिचय

लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांना सात मुली आणि दोन मुलगे आहेत — बिहारमधील सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध राजकीय कुटुंबांपैकी एक.

मुली: मीसा भारती, रोहिणी आचार्य, चंदा सिंह, रागिनी यादव, हेमा यादव, अनुश्का राव (धानू), आणि सर्वात लहान राजलक्ष्मी.

मुलगे: तेजप्रताप यादव आणि तेजस्वी यादव.

 

आरजेडीची सर्वात मोठी निवडणूक घसरण

या कुटुंबीय विस्फोटाच्या पार्श्वभूमीला बिहार निवडणुकीत आरजेडीची झालेली घसरण कारणीभूत आहे. या निवडणुकीत पक्ष ७५ वरून २५ जागांवर आला. संपूर्ण महागठबंधन फक्त ३५ जागांपर्यंत पोहोचले. प्रचंड असंतोषाचे केंद्रबिंदू तेजस्वी यादव यांची रणनीती, त्यांच्यावर प्रभाव टाकणारे सल्लागार आणि वोटर लिस्टमध्ये केलेले कथित SIR (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) असल्याचे बोलले जात आहे.

 

Exit mobile version