24 C
Mumbai
Tuesday, December 9, 2025
घरराजकारणडाव्या पक्षांनी केली राहुल गांधी यांच्या मतदारसंघाची वाटणी!

डाव्या पक्षांनी केली राहुल गांधी यांच्या मतदारसंघाची वाटणी!

सीपीआयच्या खात्यात वायनाड?

Google News Follow

Related

विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या ‘इंडिया’ गटाच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत अद्याप कोणतेही शिक्कामोर्तब झालेले नाही. मात्र आघाडीचा घटकपक्ष असेलल्या माकपची नजर काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्या केरळमधील वायनाडवर असू शकते, असे म्हटले जात आहे. याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. सन २०१९मध्ये राहुल गांधी यांनी चार लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता.

वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सत्ताधारी आघाडी एलडीएफने माकपसाठी निवडलेल्या चार जागांमध्ये वायनाडचाही समावेश केला आहे. नुकतीच पक्षाची हैदराबादमध्ये बैठक झाली. तर, काँग्रेसला वायनाड सोडून देण्याचे सांगण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सीपीआयचे महासचिव डी. राजा यांनी स्पष्ट केले. मात्र त्यांनी त्याला नकारही दिला नाही. ‘एलडीएफच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यात ज्या चार जागा सीपीआयला सोडण्यात आल्या आहेत, त्यात वायनाडही आहे. याबाबत अजून चर्चा सुरू आहे. पश्चिम बंगालमध्ये आम्हाला तीन जागा मिळाल्या आहेत,’ असे डी राजा यांनी सांगितले.

हे ही वाचा:

हमासच्या २४पैकी १७ बटालियनचा निःपात!

अमेरिकेत भारतीय स्थलांतरितांसाठी ग्रीन कार्डचा मार्ग खुला होणार

मुस्लिम धर्मगुरु अटक प्रकरणी शंभरपेक्षा जास्त जणांविरुद्ध गुन्हा

मुलुंडमध्ये भरदिवसा रस्त्यात डिलिव्हरी बॉयची हत्या

सन २०१९मध्ये राहुल गांधी यांनी वायनाडसह उत्तर प्रदेशातील अमेठीतूनही निवडणूक लढवली होती. काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात गांधी यांच्यावर पराभवाची नामुष्की आली होती. सन २००४मध्ये अमेठीतून निवडणूक लढवून राहुल गांधी यांनी राजकारणात प्रवेश केला होता. तत्पूर्वी अमेठीची जागा त्यांचे वडील व माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याकडे होती.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा