31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
घरविशेषहमासच्या २४पैकी १७ बटालियनचा निःपात!

हमासच्या २४पैकी १७ बटालियनचा निःपात!

दहशतवादी तळावर कब्जा

Google News Follow

Related

रविवारी गाझा पट्टीतील देर अल-बलाहमध्ये इस्रायलच्या हल्ल्यानंतर एकच गोंधळ उडाला. त्यात १५ जणांचा मृत्यू झाला. तर, ४५ जण जखमी झाले. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र येथे पुरेशा वैद्यकीय सुविधा नसल्याने उपचारांत अडचणी येत आहेत. त्यामुळेच लोक हे युद्ध थांबवण्याची मागणी करत आहेत. मात्र इस्रायल माघार घेण्यास तयार नाही.

याच दरम्यान इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी हमासच्या २४पैकी १७ बटालियनचा निःपात झाल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते, हमासचे बाकीचे बटालियन दक्षिण गाझामध्ये आहेत. तिथेही लष्करी कारवाई केली जात आहे.
‘आमचे पहिले आणि महत्त्वाचे लक्ष्य हमासचा निःपात आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी हमासचा बीमोड करण्याची आवश्यकता आहे. आतापर्यंत आम्ही २४पैकी १७ बटालियनचा निःपात केला आहे.

हे ही वाचा:

ललित कला केंद्राच्या वादात अभिनेते प्रशांत दामलेंनी लक्ष घालून तोडगा काढावा!

संसदेत मोदी गरजले अब की बार ४०० पार…!

पंतप्रधान मोदींच्या फोटोला काळं फासल्या प्रकरणी कुणाल राऊतला अटक!

१९९१ चा उपासना कायदा रद्द करण्याची मागणी

उर्वरित बटालियन बहुतांश दक्षिण गाझा आणि राफा येथे आहेत. आम्ही त्यांच्यावरही लवकरच कारवाई करू,’ असे नेतान्याहू यांनी स्पष्ट केले आहे. अर्थात नेतान्याहू यांना त्यांच्याच देशातून कडव्या विरोधाचा सामना करावा लागतो आहे. सरकार त्यांच्यावर टीका करून युद्ध संपवण्याची मागणी करत आहेत. हमासकडे ओलिस असलेल्या इस्रायली नागरिकांच्या नातेवाइकांनी तेल अवीव येथे संरक्षण मंत्रालयाच्या बाहेर रविवारी जोरदार निदर्शने केली. त्यांनी ओलिसांची तत्काळ सुटका करावी, यासाठी पावले उचलण्याची मागणी केली.

या आंदोलनादरम्यान नेतान्याहू मंत्रालयात कॅबिनेट बैठकीत होते. ओलिसांच्या सुटकेसाठी हमासने केलेल्या तडजोडीच्या प्रस्तावाबाबत ही बैठक बोलावण्यात आली होती.अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँथनी ब्लिंकनही सध्या मध्यपूर्वेकडील देशांच्या दौऱ्यावर आहेत. ७ ऑक्टोबरला हमास आणि इस्रायलदरम्यान युद्धाला सुरुवात झाल्यानंतर हा त्यांचा पाचवा मध्य पूर्वेकडील देशांचा दौरा आहे. या दौऱ्यात ते सौदी अरेबिया, इजिप्त, कतार, इस्रायल आणि वेस्ट बँक येथे जाणार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा