राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून १८ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या १८ जून रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर सोमवारी १ जून रोजी या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमधील उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली.
गेल्या अडीच वर्षांपासून या निवडणुका लागल्या नव्हत्या. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांपासून या आमदारकीच्या जागा रिक्त आहे. विधान परिषदेच्या एकूण ७८ सदस्य संख्येपैकी २२ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जातात. यंदा सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, नांदेड, सांगली-सातारा, यवतमाळ, पुणे, भंडारा- गोंदिया, नाशिक आणि अमरावतीच्या स्थानिक संस्थेच्या विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक होत आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला असतानाही अर्ज भरताना राजकीय गोंधळ पाहायला मिळाला.
दरम्यान, उमेदवारी अर्ज सोमवार दुपारी ३ पर्यंत भरता येणार होते. या निवडणुकीसाठी अनेकजण उत्सुक होते. त्यामुळे प्रचंड दावे-प्रतिदावे झाले. अशातच महायुती आणि महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेदही चव्हाट्यावर आले. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गतच बंड झाले. पुण्यातून सुनील टिंगरे आणि विक्रम काकडे या दोघांनीही राष्ट्रवादीच्या तिकिटावर अर्ज भरला आहे. तर, छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीत वाद झाला. या जागेवरून भाजपाने सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली आहे, तर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या समीर सत्तार यांनीही अर्ज भरला आहे.
हे ही वाचा:
भारताची ओमानकडे वस्तू निर्यात ५० टक्क्यांनी वाढणार
नीट पेपरफुटीचा ‘मास्टरमाईंड’ पी. व्ही. कुलकर्णीच्या घरावर हातोडा!
विवाहानंतर जोडप्याचे विमान अपघातग्रस्त, भारतीय वंशाच्या डेव्हचा मृत्यू, पण पत्नी वाचली!
पहलगाम हल्ल्याआधीच सक्रिय झाले फोन; पाकिस्तानी बँकेचे कनेक्शन
भाजपा उमेदवारांची नावे
- वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली- अरुण लखाणी
- भंडारा-गोंदिया- अविनाश ब्राह्मणकर
- अमरावती- प्रवीण पोटे
- सोलापूर- राजेंद्र राऊत
- सांगली, सातारा- धैर्यशील कदम
- अहिल्यानगर- प्राजक्त तनपुरे
- छत्रपती संभाजीनगर-जालना- सुहास शिरसाट
- नांदेड – अमर राजूरकर
- धाराशिव बीड लातूर- बसवराज पाटील
- जळगाव- नंदकिशोर महाजन
- नागपूर- राजीव पोतदार
शिवसेना (एकनाथ शिंदे) उमेदवारांची नावे
- ठाणे- रवींद्र फाटक
- नाशिक- नरेंद्र दराडे
- परभणी-हिंगोली- सईद खान
- यवतमाळ- दुष्यंत चतुर्वेदी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) उमेदवारांची नावे
- रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग- अनिकेत तटकरे
- पुणे- विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे
