32 C
Mumbai
Saturday, June 3, 2023
घरधर्म संस्कृतीलोकमान्य टिळकांवरच्या आक्षेपांना टिळकांच्या वंशजांचे सडेतोड उत्तर

लोकमान्य टिळकांवरच्या आक्षेपांना टिळकांच्या वंशजांचे सडेतोड उत्तर

Google News Follow

Related

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेनंतर एक नवा वाद निर्माण झाला आहे. हा वाद आहे रायगड येथील छत्रपती शिवरायांच्या समाधी बाबात. यावरून आता राज्याचे राजकारण पेटले असून मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या विषयात प्रश्न उपस्थित केले आहेत. तर त्याला लोकमान्य टिळकांचे वंशज कुणाल टिळक यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले कुणाल टिळक?
काल राज ठाकरे संभाजीनगर मध्ये भाषण झालं त्यातलं उल्लेख केला की लोकमान्य टिळकांनी रायगडावर शिवाजी महाराजांची समाधी बांधली. आज सकाळपासून त्यावर  जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावर प्रश्न विचारले, नंतर मग तो पैसा गोळा केलेला होता तर त्याचे काय झाले? असे विचारण्यात आले. राज ठाकरे यांच्या विधानावर आक्षेप नाही. पण जितेंद्र आव्हाड जे म्हणाले त्याला उत्तर देणे गरजेचे आहे.

हे ही वाचा:

राणा दाम्पत्यांच्या जामिनाची सुनावणी दोन दिवसांनी

धक्कादायक! मुंबई विद्यापीठाच्या लॉ अभ्यासक्रमाचा पेपर केला ‘सोप्पा’

वीजसंकटावर गृहमंत्री अमित शहा उचलणार पाऊल

बर्लिनमध्ये लहान मुलीच्या चित्राचे केले पंतप्रधान मोदींनी कौतुक

लोकमान्य टिळकांनी १८९१ साली एप्रिल महिन्यात एक केसरी मधे अग्रलेख लिहीला. त्यामध्ये त्यांनी महाराजांच्या वंशजांना आणि सरदारांना, संस्थानिकांना प्रश्न विचारला की महाराजांच्या रायगडावरील समाधीच्यासाठी आपण काय करू इच्छितो? आपण काय करायला पाहिजे? तर याच्या संदर्भात मे मध्ये पुण्याच्या हिराबागेत एक बैठक झाली. या बैठकीचे अध्यक्ष औंधचे पंतप्रतिनिधी होते आणि त्या बैठकीचा आयोजक लोकमान्य टिळक होते. सेनापती दाभाडे तळेगावचे ते देखील होते. या बैठकीमध्ये एक कमिटी नेमण्यात आली. टिळक या कमिटीत मेंबर होते फक्त, अध्यक्ष पण नव्हते.

या कमिटीत असा निर्णय झाला की जर शाहू महाराजांना वाटले तर ते स्वतः पूर्ण खर्च करून समाधी बांधू शकतील. पण या बैठकीत असा निर्णय झाला की प्रत्येक महाराष्ट्राच्या माणसांनी या समाधीसाठी आपला कॉन्ट्रीब्युशन द्यायला पाहिजे आणि त्यामुळे जमा केला पाहिजे. त्यामुळे जेव्हा समाधी बांधली त्या प्रत्येक महाराष्ट्राच्या माणसाला ही समाधी एक आपली आहे. या समाधीसाठी आपला हातभार लागलेला आहे असे वाटले पाहिजे. म्हणून एक फंड तयाय करण्यात आला. या फंडमध्ये पैसे गोळा करण्यात आले. तर एक बँक खाते काढून त्यात हे पैसे जमा करण्यात आले. त्याच्यामध्ये केसरीमध्ये १८९९ साली टिळकांनी केसरीमध्ये या खात्याचा सर्व हिशोब प्रकाशित केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,851चाहतेआवड दर्शवा
2,023अनुयायीअनुकरण करा
76,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा