28 C
Mumbai
Wednesday, December 31, 2025
घरराजकारणलोकसभाध्यक्ष बिर्ला म्हणाले, आणीबाणी हा काँग्रेसच्या हुकुमशाहीचा काळा अध्याय

लोकसभाध्यक्ष बिर्ला म्हणाले, आणीबाणी हा काँग्रेसच्या हुकुमशाहीचा काळा अध्याय

अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर इंदिरा गांधी, काँग्रेसवर केली टीका

Google News Follow

Related

बुधवारी संसदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आणीबाणीच्या काळाचा उल्लेख करत काँग्रेसवर जोरदार टीका केली. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर टीका करत काँग्रेसच्या हुकुमशाही वृत्तीचा निषेध केला.

२५ जून १९७५ला देशात आणीबाणी लागू झाली. त्याला या २५ जूनला ४९ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त ओम बिर्ला यांनी लोकसभेत याची दखल घेतली आणि काँग्रेसवर टीकास्त्र डागले.

ते म्हणाले की, १९७५मध्ये जी आणीबाणी लागू करण्यात आली त्याचा सभागृहाकडून निषेध केला जात आहे. ज्यांनी या आणीबाणीचा समर्थपणे सामना केला त्याचेही बिर्ला यांनी कौतुक केले. भारताच्या लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी अनेकांनी त्याग केला, याचाही उल्लेख त्यांनी केला. २५ जून १९७५ हा दिवस देशाच्या इतिहासाचा काळा अध्याय असल्याचेही ते म्हणाले. बिर्ला यांनी सभागृहात उपस्थित असलेल्या सदस्यांना लोकशाहीची हत्या ज्या दिवशी झाली त्याच्या स्मरणार्थ दोन मिनिटे स्तब्ध उभे राहण्याची सूचनाही केली.

बिर्ला यांनी तत्कालिन काँग्रेस सरकारवरही सडकून टीका केली. त्यांनी भारतावर हुकुमशाही लादल्याचेही ते म्हणाले. बिर्ला यांनी म्हटले की, जगभरात भारत ही लोकशाहीची जननी म्हणून ओळखली जाते. याच भारतात चर्चा, संवाद यांना प्रोत्साहन दिले जाते. पण इंदिरा गांधींनी या देशावर हुकुमशाही लादली. त्यामुळे देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला गेला. नागरिकांचे अधिकार हिसकावून घेण्यात आले. संपूर्ण देशालाच तुरुंग करण्यात आले. त्या काळातील हुकमशाही सरकारने माध्यमे, न्यायालयांच्या स्वतंत्रतेवर निर्बंध लादले. आपल्या देशाच्या इतिहासातील तो आणीबाणीचा काळ हा काळा अध्याय आहे.

हे ही वाचा:

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या घरात ‘अतिक्रमण’ केल्याप्रकरणी चार जणांना अटक!

सुनील गावस्करांकडून रोहित शर्मावर स्तुतीसुमने

मुंबई ‘दरड प्रवण क्षेत्र मुक्त’ करणार!

ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली अनेक देशहिताची विधेयके झाली संमत!

बिर्ला यांनी काँग्रेसने लोकशाहीची कशी हत्या केली याची काही उदाहरणे सांगितली. ते म्हणाले की, त्या काळात काँग्रेस सरकारने असे काही निर्णय घेतले की, ज्यामुळे संविधानाच्या मूळ चौकटीलाच धक्का बसला. अंतर्गत सुरक्षा कायद्याला त्यांनी नख लावले जेणेकरून मिसाच्या अंतर्गत तुरुंगात असलेल्या लोकांना न्यायालये न्याय देऊ शकणार नाहीत. माध्यमांनी सत्य प्रकाशित करू नये यासाठी अनेक कायदे आणले गेले. ३९ ते ४२ या घटनादुरुस्ती करून एकाच व्यक्तीच्या हातात अधिकार राहावेत असा प्रयत्न केला गेला.

बिर्ला म्हणाले की, नव्या पिढीने लोकशाहीच्या या काळ्या अध्यायाबद्दल जाणले पाहिजे. काँग्रेसच्या त्या सरकारने लोकांचे जीवन उद्ध्वस्त केले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा