26 C
Mumbai
Thursday, July 25, 2024
घरविशेष'ओवेसीची जीभ छाटा अन पारितोषिक घेवून जा'

‘ओवेसीची जीभ छाटा अन पारितोषिक घेवून जा’

नितेश राणे यांचे खळबळजनक विधान

Google News Follow

Related

१८ व्या लोकसभेच्या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित खासदारांचा दोन दिवसीय शपथ सोहळा पार पडला. या शपथ सोहळ्यादरम्यान हैदराबादचे नवनिर्वाचित खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही शपथ घेतली. मात्र, असदुद्दीन ओवेसी यांनी शपथ घेतल्यानंतर पॅलेस्टाईनच्या घोषणा दिल्या. यानंतर भाजकडून जोरदार विरोध करत टीका करण्यात आली. ओवेसी यांची ही वादग्रस्त घोषणा संसदेच्या रेकॉर्डमधूनही हटवण्यात आली आहे. परंतु, ओवेसी यांच्यावर टीकेचं अस्त्र अजूनही सुरूच आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी ओवेसी यांच्यावर टीका करत ओवेसीची जीभ छाटणाऱ्याला बक्षीस देणार असल्याचे म्हटले आहे.

नितेश राणे म्हणाले की, पाकिस्तानच्या संसदेत एखाद्याने ‘जय श्री राम’, वंदे मातरम’ अशा घोषणा दिल्या असत्या तर तो संसदेच्या बाहेर जिवंत येऊ शकला नसता. आमच्या संसदेत लोकशाहीची पूजा केली जाते. याच संसदेत उभे राहून बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले आहे आणि त्याच ठिकाणी विरोधी राष्ट्रांचा अतिरेक्यांचा जयजयकार केला जातो. निरपराध लोकांना मारलं जात, अशांचा जर कोणी जयजयकार करत असेल तर तो दोन पायांनी कसा बाहेर येतो याचा नागरिकांनी विचार केला पाहिजे.

हे ही वाचा:

लोकसभाध्यक्ष बिर्ला म्हणाले, आणीबाणी हा काँग्रेसच्या हुकुमशाहीचा काळा अध्याय

सुनील गावस्करांकडून रोहित शर्मावर स्तुतीसुमने

मुंबई ‘दरड प्रवण क्षेत्र मुक्त’ करणार!

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या घरात ‘अतिक्रमण’ केल्याप्रकरणी चार जणांना अटक!

पाकिस्तान आणि चीनच्या संसदेत असा प्रकार झाला असता तर तेथील संसदेने त्याला जिवंत ठेवले नसते नागरिकांनी ठेचून मारले असते. ते पुढे म्हणाले, ओवेसी तुमच्यात हिम्मत असेल तर भर चौकात या तुम्हाला भारतीयांची आणि हिंदू राष्ट्राची काय ताकद आहे ती आम्ही दाखवायला तयार आहोत. अशा ओवीसीची जीभ छाटून भर चौकात उभे केलं पाहिजे, असे कोणी करणार असेल तर त्याने मला भेटावे आणि माझ्याकडुन पारितोषिक घेऊन जावे, असे विधान नितेश राणे यांनी केलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा