31 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरराजकारणमहाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट सुरूच

महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट सुरूच

Google News Follow

Related

महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट सुरूच आहे. बुधवारी राज्यात ५९,९०७ कोरोना रुग्ण नोंदवले गेले. तर ३०,२९६ रुग्ण बरे झाले. बुधवारी पुणे जिल्ह्याने रुग्णवाढीत दहा हजारांचा टप्पा ओलांडला. पुण्यात बुधवारी १०,९०७ नवे रुग्ण अढळून आले तर ७,८३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या राज्यात ५,०१,५५९ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.

एकीकडे महाराष्ट्रात कोरोना फोफावत आहे. राज्यात कडक निर्बंधांच्या नावाखाली लॉकडाऊन लावण्यात आला आहे. लोक या अघोषित लॉकडाऊनला विरोध करत आहेत. पण या सगळ्या परिस्थितीत बुधवारी राज्यात लसीकरणाच्या मुद्द्यावरून राजकारण पेटलेले पाहायला मिळाले. महाराष्ट्रात लसीचा तुटवडा आहे आणि पुढल्या तीन दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा सध्या महाराष्ट्रात आहे असा खळबळजनक दावा महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. सध्या लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे सांगून लसीकरण वाढवण्यासाठी लस पुरवली गेली तर महत्त्वाचा प्रश्न सुटेल असेही ते म्हणाले. कोवॅक्सिन आणि कोविशिल्डची मागणी केली असल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली.

हे ही वाचा:

लसीच्या तुटवड्याचा ठाकरे सरकारचा दावा धादांत असत्य

…अन्यथा उद्रेक होईल- देवेंद्र फडणवीस

अनिल देशमुखांनी नियुक्तीसाठी मागितले २ कोटी, वाझेच्या कथित पत्रात गौप्य्स्फोट

महाराष्ट्र सरकारने लसीचे राजकारण करू नये

पण राजेश टोपे यांनी लसीकरणासाठी केंद्राकडे बोट दाखवल्या नंतर केंद्र सरकारने त्यांच्या दाव्यातील असत्यता लोकांसमोर आणली. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी एका पत्राद्वारे ठाकरे सरकारच्या खोट्या दाव्यांची पोलखोल केली तर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून ठाकरे सरकारला उघडे पाडले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा