29 C
Mumbai
Saturday, October 24, 2026
घरदेश दुनियाहिंसेला कारणीभूत असलेल्या तृणमूलच्या ममता विश्वशांती संमेलनासाठी का उत्सुक?

हिंसेला कारणीभूत असलेल्या तृणमूलच्या ममता विश्वशांती संमेलनासाठी का उत्सुक?

Google News Follow

इटलीच्या रोममध्ये मदर तेरेसा यांच्या विश्व शांती संमेलनाला जाण्यासाठी ममता बॅनर्जी इच्छुक आहेत, पण केंद्र सरकारने त्यांना परवानगी न दिल्यामुळे त्या उखडल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये त्यांच्या तृणमूल काँग्रेसने प्रचंड हिंसाचार केल्याचा आरोप असताना त्या विश्वशांतीसाठी रोमला का जाऊ इच्छितात, असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.

नरेंद्र मोदी आपल्यावर जळत असल्यामुळे आपल्याला जाऊ देत नाहीत, असा कांगावा आता ममता यांनी करायला प्रारंभ केला आहे. या विश्वशांती संमेलनात जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल, पोप फ्रान्सिस, इटलीचे पंतप्रधान मारिओ ड्रॅगी उपस्थित राहणार आहेत. पण भारतातून इटली सरकारने ममता बॅनर्जी यांना का आमंत्रित केले असेल याबद्दल मात्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिवाय, या संमेलनात आपल्याला परवानगी दिली असती तर हिंदूंचे प्रतिनिधित्व आपण केले असते, असा दावाही ममता बॅनर्जी यांनी केला आहे. हिंदू महिला म्हणून ममता बॅनर्जी यांनाच का या संमेलनाला आमंत्रित केले असेल असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

पश्चिम बंगालमधील निवडणुकांआधी आणि नंतर प्रचंड हिंसाचार झाला. त्यात भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांची हत्या झाली तसेच बलात्कारही झाले. या दंग्यांना तृणमूल जबाबदार असल्याचे अहवाल समोर आले होते. त्याच पक्षाच्या ममता बॅनर्जी आता विश्वशांतीसाठी आग्रही आहेत, याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.

हे ही वाचा:

आरे कारशेडच्या विरोधामुळे मेट्रो चार वर्षे ताटकळणार!

मुंबई सेंट्रल स्टेशनमध्ये आता आरामात राहा…

राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत बोरिवलीचे १० खेळाडू

महाराष्ट्रातील जंगल सफारी पुन्हा सुरु होणार

ममता बॅनर्जी यांनी याआधी चीनलाही भेट देण्याचा प्रयत्न केला आहे. २०१८मध्ये त्या चीनला जाणार होत्या तर गेल्या वर्षीही त्यांनी चीनची भेट ठरविली होती. चीनी गुंतवणुकीसाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याबद्दल केंद्र सरकारने नाराजी व्यक्त केली होती.

 

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा