34 C
Mumbai
Wednesday, October 27, 2021
घरविशेषमुंबई सेंट्रल स्टेशनमध्ये आता आरामात राहा...

मुंबई सेंट्रल स्टेशनमध्ये आता आरामात राहा…

Related

भारतीय रेल्वे प्रवासी येत्या काही दिवसांमध्ये मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर परवडणारे आणि आरामदायक निवासाचा अनुभव घेऊ शकणार आहेत.

भारतीय रेल्वेचे पहिले पॉड हॉटेल मुंबई सेंट्रल स्टेशनवर उभारण्यात आलेले आहे. भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने हे विकसित केले आहे. त्यामुळेच आता एकट्याने मुंबईत येणारे अगदी माफक दरात राहू शकणार आहेत. मुंबई सेंट्रल येथील या हॉटेलचे काम पुढच्याच महिन्यात पूर्ण होणार आहे. हे पॉड हॉटेल येत्या नोव्हेंबरपासून प्रवाशांसाठी खुले होणार आहे.

मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनच्या पहिल्या मजल्यावर दोन नॉन वातानुकूलित प्रतीक्षालयांचे पॉड हॉटेलमध्ये रूपांतर झालेले आहे. या पॉड हॉटेलमध्ये लहान आणि अत्याधुनिक कॅप्सूल असलेल्या खोल्या आहेत. तसेच या सेवेमुळे प्रवाशांना रात्रभर आराम करता येईल तसेच निवासाची सोयही उपलब्ध होणार आहे.

पॉड कॅप्सूलचे डिझाईन आणि स्पेसिफिकेशन पॉड हॉटेल्ससारखेच आहे. तसेच यातील मुख्य बाब म्हणजे देशातील पहिले पॉड हॉटेल २०१७ मध्ये अंधेरीमध्ये उघडले होते. हे पॉड हॉटेल खासगीरित्या चालवले जाणारे पॉड हॉटेल आहे.

हे ही वाचा:

आरे कारशेडच्या विरोधामुळे मेट्रो चार वर्षे ताटकळणार!

राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत बोरिवलीचे १० खेळाडू

पालिकेला दिसले मुंबईत फक्त ९२७ खड्डे

मोदींनी आणली प्राचीन संस्कृती पुन्हा भारतात

पॉड हॉटेलमध्ये निवासाचा खर्च भारतीय रेल्वे स्थानकांवरील खोल्यांच्या किंमतीपेक्षा स्वस्त असण्याची अपेक्षा आहे. या पॉड हॉटेलमध्ये १२ तासांपर्यंत निवासाची सुविधा पुरवतील. कॅप्सूल क्लासिक आणि सूट या दोन प्रकारांमध्ये विभागले जातील. क्लासिक पॉड्स एका प्रवाशाला राहण्याची सोयींनी सुसज्ज असणार आहे. तसेच बॅगेज स्पेस, लॉकर, चार्जिंग सॉकेट्स सारख्या सुविधांनी सुसज्ज असतील.

सुईट पॉड्स वायफाय, वैयक्तिक लॉकर्स सारख्या सुविधांनी सुसज्ज असतील आणि दोन प्रवाशांसाठी एक मोठा बेड असेल. आयआरसीटीसी पॉड हॉटेलमधील इतर सामान्य सुविधांमध्ये चेंजिंग रूम, लाउंज एरिया, वॉशरूम तसेच कॅफेटेरियाचा समावेश आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,446अनुयायीअनुकरण करा
4,450सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा