26 C
Mumbai
Wednesday, July 17, 2024
घरराजकारणगावातील लोकांमध्ये फूट पाडून राजकीय पक्षांनी आपली दुकाने चालवली

गावातील लोकांमध्ये फूट पाडून राजकीय पक्षांनी आपली दुकाने चालवली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर घणाघात

Google News Follow

Related

पूर्वीची सरकारे गावांसाठी पैसा खर्च करण्यास हात आखडता घेत होती कारण ती त्यांची व्होट बँक नव्हती. परिणामी गावे दुर्लक्षित राहिली. उलट गावातील लोकांमध्ये फूट पाडून अनेक राजकीय पक्ष आपली दुकाने चालवत होते असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केला. मध्यप्रेदशातील रिवा येथे राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त पंतप्रधानांच्या हस्ते अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आले. रीवा येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पंतप्रधान मोदी बोलत होते.

 काँग्रेसवर हल्लाबोल करतांना पंतप्रधान मोदी म्हणाले, स्वातंत्र्यानंतर ज्या पक्षाने सर्वाधिक काळ सरकार चालवले त्या पक्षाने गावातील लोकांच्या विश्वासाला तडा दिला. खेड्यातील माणसे, रस्ते, साठवणुकीची ठिकाणे, शाळा, वीज, अर्थव्यवस्था या सर्व गोष्टी काँग्रेसच्या राजवटीत सरकारच्या अग्रक्रमाच्या तळाशी होत्या. देशाची अर्ध्याहून अधिक लोकसंख्या ज्या गावांमध्ये राहते त्यांना सापत्नपणाची वागणूक देऊन देश प्रगती करू शकत नाही अशा शब्दात पंतप्रधांनी कान टोचले.

यापूर्वीच्या काँग्रेस सरकारांवर पंचायत व्यवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करून पंतप्रधान म्हणाले, शेकडो वर्षांपासून असलेल्या असलेल्या पंचायतराज व्यवस्थेवर स्वातंत्र्यानंतरही विश्वास ठेवला गेला नाही. आदरणीय बापू म्हणायचे की भारताचा आत्मा खेड्यात राहतो, पण काँग्रेसने गांधींच्या विचारांकडेही दुर्लक्ष केले. ९० च्या दशकात पंचायती राजच्या नावावर अन्नपुरवठा नक्कीच केला गेला, पण या सरकारांनी गरज असतांनाही पंचायतींकडे लक्ष दिले नाही असा जोरदार आरोप केला.

हे ही वाचा:

यात्रा कर घेऊनही गणपतीपुळ्यात पर्यटकांना सुविधांच्या नावाने बोंबच .. !

अश्लील रॅप गाण्याच्या चित्रीकरणाच्या विरोधात अभाविपची पुणे विद्यापीठात जोरदार निदर्शने

देशात विणल्या गेले तब्बल ५० हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्गांचे जाळे

साशानंतर आता उदय चित्त्याने घेतला जगाचा निरोप

भाजपने गावांवरील हा अन्याय संपवून त्यांच्या विकासासाठी तिजोरी खुली केली आहे. २०१४ पासून देशाने पंचायतींच्या सक्षमीकरणाचे काम हाती घेतले आहे. २०१४ पूर्वी पंचायतींसाठी वित्त आयोगाचे अनुदान ७०हजार कोटींपेक्षा कमी होते. २०१४ नंतर हे अनुदान ७० हजारांवरून २ लाख कोटींपेक्षा जास्त झाले आहे. २०१४ पूर्वीच्या १०वर्षांत तत्कालीन केंद्र सरकारने ६,००० पंचायत इमारती बांधल्या . परंतु आमच्या सरकारने आठ वर्षांत ३०,००० पेक्षा जास्त नवीन पंचायत इमारती बांधल्या आहेत. २०१४ पासून आम्ही आमच्या पंचायतींना सक्षम करण्याचे काम हाती घेतले आहे. आज त्याचे परिणाम दिसून येत आहेत. आज भारतातील ग्रामपंचायती गावाच्या विकासाचा प्राण म्हणून उदयास येत आहेत याकडे पंतप्रधानांनी यावेळी लक्ष वेधले. 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
164,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा