27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
घरराजकारणमहाराष्ट्र मॉडेलमध्ये कोविड योद्धे संपावर

महाराष्ट्र मॉडेलमध्ये कोविड योद्धे संपावर

Google News Follow

Related

महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांनी शुक्रवारपासून राज्यभरात बेमुदत संप पुकारला आहे. महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) ने म्हटले आहे की ते आज सकाळी ८ वाजता त्यांचा संप सुरू करतील. जोपर्यंत पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क माफ करणे, कोविड-१९ काळातील कामाबद्दल अधिक मोबदला आणि शासनातर्फे उत्तम वसतिगृह सुविधा या त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोवर संप सुरु राहील.

महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) ही राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांच्या निवासी डॉक्टरांची संघटना आहे. राज्यभरातील सर्व शासकीय आणि महानगरपालिका प्रशासित रुग्णालयांमध्ये निवासी डॉक्टरांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्याची स्थापना करण्यात आली आहे.

२०१९ पर्यंत मार्डमध्ये ४,५०० निवासी डॉक्टर सदस्य होते. डॉक्टरांचे म्हणणे आहे की ऑगस्टमध्ये आश्वासनं देऊनसुद्धा अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांवर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे आता आमच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील असे लेखी आश्वासन आवश्यक आहे.

हे ही वाचा:

एअर इंडियाची घरवापसी निश्चित

‘लोकांना सांगा मी क्रांतिकारी होतो’… सरदार उधम चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

‘डी’ गँगचे कारनामे उघडकीस आणण्यासाठी एनसीबी तत्पर

मुख्य सचिव कुंटे आणि पोलिस महासंचालक संजय पांडेंना सीबीआयचे बोलावणे

“आम्ही गेल्या पाच महिन्यांपासून हे मुद्दे मांडत आहोत. पण कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. ठाकरे सरकारकडून कोणतेही लेखी आश्वासन मिळाले नाही म्हणून आम्ही उद्यापासून संपावर जाऊ.” असे मार्डचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ढोबळे पाटील यांनी गुरुवारी संपापूर्वी पीटीआयला सांगितले. मार्डचे सदस्य डॉ अक्षय यादव एएनआयशी बोलताना म्हणाले, “डॉक्टरांनी भारतातील लोकांसाठी सर्वस्व अर्पण केले आहे. त्यामुळे आम्हा कोविड -१९ योद्ध्यांना फक्त न्याय हवा आहे.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा