33 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरराजकारणसंजय राऊत भ्रमिष्ट झालेत, त्यांना तात्काळ मानसोपचारतज्ज्ञाकडे न्या!

संजय राऊत भ्रमिष्ट झालेत, त्यांना तात्काळ मानसोपचारतज्ज्ञाकडे न्या!

भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी घेतला समाचार

Google News Follow

Related

संजय राऊत भ्रमिष्ट झाले आहेत. त्यांना तातडीने मानसोपचारतज्ज्ञाकडे नेण्याची गरज असल्याची जोरदार टीका भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही बदला घेणार नाही आम्ही सर्वांना माफ केले आहे असे विधान केले होते. या विधानानंतर भाजप ठाकरे गटाशी जवळीक साधत असल्याची चर्चा सुरु झाली. यासंदर्भात विधान करतांना खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, फडणवीस यांनी बोलावले तरी आम्ही जाणार नाही. या संदर्भात आमदार भातखळकर यांना माध्यमांनी विचारले. त्यावर भातखळकर यांनी राऊत यांना जोरदार टोला लगावला.

आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या आधी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांना विधी मंडळाच्या आवारात पत्रकारांनी प्रश्न विचारला. संजय राऊत भ्रमिष्ट मनुष्य आहेत. दररोज काहीही बडबडत असतात सकाळी उठल्यावर. भ्रमिष्ट झाले आहेत. ते पूर्वी कंपाउंडरकडून औषध घ्यायचे आता कंपाउंडरकडून घेत नाहीत. कंपाउंडरकडून औषध घेतो असे त्यांनीच सांगितले होते. आता त्यांच्याकडूनही घेत नाहीत.संजय राऊत यांना तात्काळ मानसोपचारतज्ज्ञाकडे नेण्याची गरज असलयाची जोरदार टीका भातखळकर यांनी केली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी विरोधकांनी अवकाळी पावसाच्या मदतीवरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. धुळवडीच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसान झालेल्या शेतीच्या भागातील पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. पण तरीही विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही पारा चढला होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राजकारण करू नका असे सुनावले. सरकारकडून नुकसानीच्या माहितीचे निवेदन सभागृहात सादर केले होते.

हे ही वाचा:

महिला दिनाच्या निमित्ताने अनोखा माहेरवाशिणी महिला दिवस

राऊतांची तर रोजच होळी, तीच बोंब तीच भांग

विधी मंडळ आहे ते, राणीची बाग नाही…

इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ

गुरुवारी सकाळी विरोधकांनी पुन्हा हाच मुद्दा काढून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. या संदर्भात विचारले असता भातखळकर यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. लबाड, थापेबाज लोक आहेत. हे सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिला निर्णय केला. एनडीआरएफच्या दुप्पट मदत शेतकऱ्यांना केली आहे. त्यामुळे ही केवळ नौटंकी आहे हे महाराष्ट्राच्या लोकांना माहिती आहे. कारण महाराष्ट्रातल्या जनतेने यांना आशीर्वाद दिलेला नसतानासुद्धा अडीच वर्षात त्यांचा अनुभव बघितला आहे अशी जोरदार टीका केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा