27 C
Mumbai
Thursday, February 12, 2026
घरराजकारणविजयाचा 'एमवाय' फॉर्म्युला म्हणजे महिला आणि युवा!

विजयाचा ‘एमवाय’ फॉर्म्युला म्हणजे महिला आणि युवा!

नरेंद्र मोदांनी दिला यशाचा मंत्र

Google News Follow

Related

हा प्रचंड विजय, हा अतूट विश्वास दाखवत बिहारच्या लोकांनी निवडणुकीत विरोधकांचा पार गर्दा उडवून दिला आहे, अशा शब्दांत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या दणदणीत यशाचे वर्णन केले. बिहारमध्ये एनडीएने २०२ जागी विजय मिळवित सगळे विक्रम मोडीत काढले. आरजेडी काँग्रेसचा तर साफ धुव्वा उडाला. त्यांना अवघ्या ३५ जागा मिळाल्या त्यात काँग्रेसला फक्त ५ जागांवर समाधान मानावं लागलं.

मोदी म्हणाले की, आज बिहारच्या घराघरात मखानाची खीर बनविण्यात येईल. मला आनंद होतो आहे, की इथेही सगळे कार्यकर्ते हीच खीर खाणार आहेत. आम्ही एनडीएचे लोक आम्हाला जनता जनार्दनचे सेवक आहोत. आम्ही आपल्या मेहनतीने जनतेचे हृदय जिंकतो. आम्ही जनता जर्नादर्नचे हृदय चोरले आहे. म्हणूनच पूर्ण बिहारने हे संगितले की, फिर एक बार एनडीए सरकार.  बिहारच्या निवडणुकीत जंगलराज, कट्टा सरकार बद्दल मी बोलत होतो तेव्हा आरजेडीने विरोध केला नाही. पण काँग्रेसला ते बोचत होते. मी पुन्हा म्हणतो की पुन्हा येणार नाही कट्टा सरकार.

बिहारच्या लोकांनी विकसित बिहारसाठी मतदान केले आहे. बिहारच्या लोकांनी समृद्ध बिहारसाठी मतदान केले आहे. मी निवडणुक प्रचारात भरघोस मतदानाचे आवाहन केले होते. लोकांनी सारे रेकॉर्ड तोडले. मी बिहारच्या लोकांसाठी एनडीएला प्रचंड विजय मिळवून देण्याचा आग्रह धरला होता. बिहारच्या लोकांनी हा आग्रह मान्य केला. बिहारने २०१०नंतर सगळ्यात मोठा जनादेश एनडीएला दिला. मी विनम्रतेने एनडीएच्या सगळ्या पक्षांच्या वतीने बिहारच्या महान जनतेचे आभार मानतो. बिहारच्या महान जनतेला आदरपूर्वक नमन करतो, असेही मोदी म्हणाले.

मी आज लोकनायक जयप्रकाश नारायण, भारतरत्न कर्पुरी ठआकूर यांनाही आदरपूर्वक नमन करतो. कर्पुरी ठआकूर यांच्य गावातून मी बिहार निवडणूक अभइया सुरू केले. हा बिहारच्या विकासाला वेगळ् उंचीवर न्ययचे आहे.

एक जुनी म्हण आहे ‘लोहा लोहेको काटता है’. बिहारमध्ये काही पक्षांनी तुष्टीकरणाचा एमवाय अर्थात MY फॉर्म्युला (मुस्लिम-यादव) केला होता. पण या विजयाने नवा सकारात्मक एमवाय माय फॉर्म्युला दिला आहे. महिला व युवा हा तो फॉर्म्युला आहे. आज बिहार देशातील त्या राज्यात आहे ज्यात सगळ्यात जास्त युवांची संख्या आहे. त्यात अनेक जातीधर्माचे युवक आहेत. त्यांच्या स्वप्नांनी जंगलराजच्या जुन्या माय फॉर्म्युलाला ध्वस्त केले आहे. मी आज बिहारच्या युवांचे विशेष अभिनंदन करतो.

मी बिहारच्या बहिणी, मुलींचे अभार मानतो. श्रमिक पशुपालक, दुकानदार सगळ्यांना नमन करतो. मी एनडीएच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. नितिशजीनी शानदार नेतृत्व दिले. प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल, सम्राट चौधरी, विजय सिन्हा यांनी मेहनत घेतली. जितन राम मांझी यांनी उत्कृष्ट नेतृत्वगुण दाखविले. एनडीएच्या कार्यकर्त्यांनीही बूथ लेव्हलला ताळमेळ दाखवून दिला. मी देशातील भाजपा कार्यकर्त्यांचेही अभिनंदन करतो. तुम्ही बिहारच्या कार्यकर्त्यांसबोत भाजपाची, एनडीएची झोळी विजयाने भरून दिली आहे. मी जम्मू काश्मीरच्या नगरोटा, उडीसा नुवापडाच्या जनतेचाही आभारी आहे. त्यांनी पोटनिवडणुकीत भाजपाचा विजय निश्चित केला. आज एनडीएचा विजयच झालेला नाही तर लोकशाहीचाही विजय झालेला आहे. भारताच्या लोकशाहीवर भरवसा ठेवणाऱ्यांचा विजय आहे.

हे ही वाचा:

बिहारी GEN-Z नेच चिरडले…

एनडीएचा बिहारमध्ये झंझावात, २०२ जागा जिंकल्या, तेजस्वी-राहुलची धूळधाण

दिल्ली स्फोटकांचे धागेदोरे मिनी पाकिस्तान बनलेल्या ‘नूंह’मध्ये

पहिला टेस्ट धडाका! जसप्रीत बुमराहचा ‘पंजा’, साउथ आफ्रिका केवळ १५९ धावांत कोसळली

या निवडणुकीने निवडणूक आयोगावरील जनतेच्या विश्वासाला मजबूत केले आहे. मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात मतदान होणे, वंचित, शोषितांना मतदान करता येणे हे निवडणूक आयोगाचे यश आहे. हे तेच बिहार आहे जिथे आधी माओवाद, दहशत मोठ्या प्रमाणावर होती. नक्षलप्रभावी भागात ३ वाजता मतदान संपत असे. पण यावेळी बिहारमध्ये कोणत्याही भीतीशिवाय लोकांनी उत्साहाने उत्सवाप्रमाणे मत दिले. बिहारमध्ये जेव्हा जंगलराज होते. तेव्हा काय काय होत होते, हे पण तुम्ही जाणता. मतदान केंद्रांवर हिंसा होत असे. मतपेट्या लुटल्या जात असतं. आज तोच बिहार विक्रमी मतदान करतो आहे. शांतीपूर्ण मतदान करत आहे. प्रत्येकाचे मत नोंदवले गेले. प्रतयेकाने आपल्या पसंतीचे मत दिले आहे.

जामिनावर असलेल्यांना साथ नाही

बिहारमध्ये कोणतीही निवडणूक अशी होत नसे जिथे पुन्हा मतदान घेतले जात नसेत. शेकडो जागी मतदान पुन्हा घेतले जात असे. १९९४मध्ये दीडहजार ठिकाणी पुनर्मतदान झाले. पण जंगलराज गेले आणि स्थिती बदलली, सुधारली. आता तर दोन टप्प्यातील निवडणुकीत कुठेही मतदान पुन्हा घ्यावे लागले नाही. यावेळी शांतीपूर्ण मतदान झाले. मी त्यासाठी निवडणूक आयोग, त्यांचे कर्मचारी, सुरक्षा दले, बिहारचे जागरूक मतदार सगळ्यांचे अभिनंदन करतो. देशाला तुमच्याबद्दल अभिमान आहे, हे मी गर्वाने सांगू इच्छितो की,  बिहारच्या निवडणुकीने एक आणखी गोष्ट सिद्ध केली आहे. देशातील मतदार विशेषतः युवा मतदार मतदारयादीतील शुद्धीकरणाला गंभीरपणे पाहतो. बिहारच्या युवकांनीही या शुद्धीकरणाला जबरदस्त पाठिंबा दिला. मी हे मान्य करतो की, लोकशाहीमध्ये त्याच्या पवित्रतेसाठी प्रत्येक मतदाराचे महत्त्व असते, त्याचा हक्क असतो. आता प्रत्येक पक्षाचे हे कर्तव्य आहे, आपल्या पोलिंग पार्टीला सक्रीय करा आणि मतदारयादी शुद्धीकरण कार्यात जोडून घ्या. शतप्रतिशत योगदान द्या. त्यामुळे बाकी जागी मतदारयादीचे शुद्धीकरणे होऊ शकेल. बिहार ही अशी  धरती आहे जिचा भारताच्या लोकशाहीची जननी असा गौरव होतो. या धऱतीने लोकशाहीवर हल्ला करणाऱ्यांना धूळ चारली आहे. बिहारने पुन्हा दाखवून दिले आहे. खोट्याचा माथी गोटा. जनविश्वास जिंकतो. बिहारने हे छातीठोकपणे सांगितले की,  जामिनावर असलेल्यांना साथ नाही.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
291,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा