31 C
Mumbai
Monday, December 8, 2025
घरसंपादकीयबिहारी GEN-Z नेच चिरडले...

बिहारी GEN-Z नेच चिरडले…

Google News Follow

Related

बिहार निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. रालोआला टोलेजंग विजय मिळाला. बिहारी जनतेने काँग्रेसला पार रस्तावर आणले. राष्ट्रीय जनतादलाचा कडेलोट केला. काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार जी खंत व्यक्त करत होते की जेन झी, रस्त्यावर का उतरत नाही. त्यांचीही मनोकामना पूर्ण झाली. १४ लाख तरुणांनी पहील्यांदा मतदान केले. ७१ टक्के महिलांनी मतदान केले. रालोआला बढत मिळालेल्या जागांचा आकडा पाहीला तर ही मतं कोणाला पडली, असा प्रश्न उरतच नाही. निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येक महिलेच्या खात्यात डिपॉझिट केलेल्या १० हजारांमुळे हा पराभव झाला, निवडणूक आयुक्त ग्यानेश गुप्ता यांच्यामुळे हा पराभव झाला, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हीजनमुळे हा पराभव झाला, असा कांगावा आता सुरू झाला आहे. काँग्रेसच्या पराभवाच्या पराभवाचे एकमेव कारण आहे, ते म्हणजे राहुल गांधी यांचे नेतृत्व.

बिहार मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात जिंकण्यासाठी ताकद लावण्यापेक्षा मध्यप्रदेशातील पंचमढीत पक्षाचे शिबार घेऊन त्यांच्यासमोर पुशअप्स मारण्यात राहुल गांधी यांची ऊर्जा खर्च झाली. शिबारीत हजर राहण्यासाठी दोन मिनिटे उशीर झाला त्यामुळे त्याना पुशअप्स मारण्याची शिक्षा देण्यात आली होती. हेच बालिश चाळे काँग्रेसला नडतायत. निवडणुकीच्या आधीचे काही तास किती महत्वाचे असतात. या काळात निवडणुकीचे राज्य सोडून अन्य राज्यात पक्षाची शिबीर आयोजित करणारा काँग्रेस पक्ष, राहुल गांधी यांचे सल्लागार आणि स्वत: राहुल गांधी म्हणजे धन्य धन्य. कधी काय करायचे याची साधी जाण नाही आणि हरल्यावर हे मोदींना दोष देतात. देशातील घटनात्मक संस्थावर चिखलफेक करणे, मतदारांनी दिलेल्या जनादेशाचा सतत अपमान करणे, हेच राहुल गांधी यांच्या बुडाशी येते आहे. मतदारांनी याच मूर्खपणाचा वचपा काढलेला आहे.

वोट चोरीचा मुद्दा लोकांच्या गळी उतरवण्याचा जोरदार प्रयत्न झाला. तीन-चार पत्रकार परीषदा झाल्या. सोशल मीडियावरच्या काँग्रेसच्या ट्रोल धाडीने कमरे खालच्या पोस्ट टाकून धुरळा निर्माण करण्याचा प्रय़त्न केला. अधिकाधिक गलिच्छ भाषेत मोदींचा पाणउतारा करण्याची, त्यांच्यावर चिखल फेकण्याची काँग्रेस प्रवक्त्यांमध्ये स्पर्धा लागली होती. ज्या काळी काँग्रेस पक्षाकडे विठ्ठलराव गाडगीळ, अंबिका सोनी यांच्यासारखे प्रवक्ते होते, त्या काँग्रेसकडे आज पवन खेरा, सुप्रिया श्रीनेत सारखे चौथ्या दर्जाचे प्रवक्ते आहेत. तोंड उघडले की दुर्गंधीच बाहेर येते. राहुल गांधी यांनी बाईक रॅली काढली, वोट अधिकार यात्रा काढली. जिलब्या तळल्या, डोसे बनवले, काही उपयोग झाला नाही. राहुल गांधी यांची समस्या काँग्रेसच्या नेत्यांना लक्षातच येत नाही. तुम्हाला मुंबईतून सोलापूरला ट्रेनने जायचे असेल तर तुम्ही सिद्धेश्वर एक्सप्रेसने जाल. किंवा त्या दिशेने जाणाऱ्या दुसऱ्या ट्रेनमध्ये बसाल. परंतु राहुल गांधी मांडवी एक्सप्रेसमध्ये बसतील जी ट्रेन सोलापूरच्या दिशेने जातच नाही. मांडवीने गोव्यात पोहोचल्यावर ते ट्रेनच्या ड्रायव्हरला शिव्या घालतील. म्हणतील की स्टेशन चोरी झालेली आहे.

मोदींनी शिव्या घालून, त्यांना बदनाम करून सत्ता मिळवण्याचा त्यांचा आणखी एक प्रय़त्न फसलेला आहे. त्यांचे साथीदार तेजस्वी यादव याची परिस्थिती फार वेगळी नाही. जिंकून आलो तर घरटी एक सरकारी नोकरी देणार, असे आश्वासन त्यांनी दिले होते. मतदार मूर्ख आहे, असा या दोघांनी ठाम समज करून घेतलेला आहे. ज्या माणसाने उपमुख्यमंत्री पदी असताना नोकरी द्यायचे आश्वासन देऊन जमीनी लाटल्या, ज्याच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल आहे,  त्याच्या आश्वासनावर बिहारची जनता विश्वास कसा ठेवेल? बिहारची जनता जंगलराज विसरलेली नाही. राघोपूर मतदार संघात विजयी होण्यासाठी जर तेजस्वींना संघर्ष करावा लागत असेल तर यादव मतदारांनीही त्यांची साथ दिली नाही, असे म्हणावे लागले.

जनसुराज पक्षाच्या माध्यमातून सेफोलॉजिस्ट, रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी निवडणुकीत पहील्यांदा एण्ट्री घेतली. तुम्ही राजकीय नेत्यांचे सल्लागार म्हणून बरे वाटता, राजकारण हा तुमचा प्रांत नाही, असे संकेत त्यांना बिहारी मतदारांनी दिलेले आहेत. जातीचे राजकारण आणि वोट चोरी हे दोन्ही मुद्दे निवडणुकीत चालले नाहीत.

स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हीजनमुळे पराभव झाला, निवडणूक आय़ुक्त ग्यानेश गुप्ता यांच्यामुळे पराभव झाला, अशी रडारड काँग्रेसचे नेते करतायत. एसआयआरमुळे ६५ लाख नावे मतदार यादीतून गाळली गेली. म्हणजे जे मृत होते, ज्यांची नावे एका पेक्षा जास्त ठिकाणी होती. किंवा जे बांगलादेशी होते. ही नावे वगळली गेली म्हणून काँग्रेसवाले इतका शोक का करतायत? राहुल गांधी तर त्यांच्या पत्रकार परिषदांमधून मतदार यादीतील त्रुटींचे मुद्दे उकरून काढतायत? एका बाजूला या त्रुटींच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरायचे, दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगाने या त्रुटी दूर करण्यासाठी एसआयआरचा निर्णय घेतला तर त्यालाही विरोध करायचा. म्हणजे आधी म्हणायचे की, मैदानात कचरा झालाय, एखादा झाडू घेऊन कचरा साफ करायला आला की त्याला म्हणायचे की तुला मैदान बळकवायचे आहे.

हे ही वाचा:

“पराभवांनाही राहुल गांधी विश्वासार्ह कसे वाटतात ही विचार करण्यासारखी बाब”

कगिसो रबाडा का नाही खेळला?

महिलांचे मतदान, प्रथमच हिंसेव्यतिरिक्त निवडणूक, जंगलराजबद्दल चीड…

“बिहार जिंकले आता लक्ष्य पश्चिम बंगालवर”

समस्या काँग्रेस पक्षाची आहे. त्यांचा गोंधळ झालेला आहे. लोकांचे डोके ठिकाणावर आहे. ६५ लाख मतदारांचे नाव गाळले गेल्यानंतरही २०२० च्या निवडणुकीच्या तुलनेत मतदान ९.६२ टक्क्यांनी वाढलेले आहे. २०२० मध्ये ५७.२९ टक्के मतदान झाले होते, २०२५ मध्ये ६६.९१ ट्केक झाले. ही वाढ महिला मतदारांमुळे आहे हे लक्षात घ्या. २०२० मध्ये ५९.६ टक्के महिलांनी मतदान केले होते. २०२५ मध्ये ७१.६ टक्के महिलांनी मतदान केले. म्हणजे सुमारे १२ टक्क्यांची घसघशीत वाढ आहे. राजदची सत्ता येणार या शक्यतेने महिला धास्तावल्या असाव्यात पुन्हा विनयभंग, बलात्कार, अपहरण, झुंडशाही नको म्हणून त्या मोदी-नीतीश कुमार यांच्या पाठिशी उभ्या राहिल्या. राहुल आणि तेजस्वी यांच्या जोडगोळीपेक्षा मोदी आणि नीतीश हे कधीही उजवे आहेत. राहुल गांधी हिंदूविरोधी आहेत, कट्टरवादी मुस्लीमांना धार्जिणे आहेत. तेजस्वी यादव यांनीही नवरात्रीत माशांचे काटे सोडवताना सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या होत्या. तुम्ही काय खाता काय नाही, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. फक्त सोशल मीडियावर पोस्टी टाकताना दुसऱ्याच्या भावनांची टवाळी करण्याचा इरादा असेल तर परीणाम भोगायलाही तयार राहा.

नीतीश कुमार यांनी बिहारला जंगलराज मुक्त केले. महिलांना सुरक्षित वातावरण दिले, या उपर त्यांनी काहीही केले नसते तरीही लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले असते. १९९० ते २००५ असे १५ वर्ष जंगलराज होते. या काळात ३२ हजार अपहरण आणि ११८ हत्याकांडांची नोंद आहे. ही हत्याकांडे जातीपातीच्या वादातून झाले होते. हे जंगलराज नीतीशबाबू यांनी संपवलेच; शिवाय नीतीशबाबू विकासाच्या निकषावरही खरे उतरले. २०२४-२५ चा बिहारच्या जीएसडीपीचा (सकल उत्पादनाचा) विकासदर १४ टक्के आहे. देशात आर्थिक वाढीचा सर्वाधिक वेग नोंदवणाऱ्या तामिळनाडूनंतर देशात बिहारचा क्रमांक येतो. दहा वर्ष यात सातत्य आहे. गेल्या दहा वर्षात बिहारचा विकास कंपाऊंड एन्यूअल ग्रोथ रेट(CAGR) अर्थात चक्रवाढीने होणारी वार्षिक आर्थिक वाढ. १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

१२ सप्टेंबर रोजी टाइम्स ऑफ इंडियामध्ये बातमी आली होती की, बिहारच्या औद्योगिक उत्पादनाने कृषी उत्पादनला मागे टाकले. म्हणजे लालू प्रसाद यादव यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत जे राज्य बिमारु राज्यात गणले जायचे तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नीतीश कुमार यांच्या प्रयत्नाने विकासाची गंगा आलेली आहे.

पूर्वीच्या तुलनेत सहज उपलब्ध होणाऱ्या बिहारी मजूरांचे प्रमाण कमी झाले आहे, म्हणूनच देशात जिथे तिथे तुम्हाला बांगलादेशी मजूर पाहायला मिळतील. जे उत्तर प्रदेशात घडतेय तेच बिहारमध्येही घडते आहे. राहुल गांधी यांच्यासारखे सत्तापिपासू नेते सतत ठणाणा करतायत, तरुणांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन करताय. तरुण त्याला फार किंमत देत नाहीत, त्याचे गुपित या विकासात दडलेले आहे.

हरीयाणात पोस्टल बॅलेटमध्ये आम्ही पुढे होतो, एक्झिट पोलमध्ये आम्ही पुढे होतो, तरीही आम्ही हरलो असा बालिश दावा राहुल गांधी यांनी केला होता. बिहारच्या सुज्ञ मतदारांनी या बावळटपणाला वाव ठेवलेला नाही. हा पराभव राहुल गांधींना सहन होण्याची शक्यता नाही, त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा थायलंड दौरा करून शांत होऊन यावे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा