बिहारच्या विधानसभा निवडणुकीत एनडीएनने जबरदस्त कामगिरी केल्याचे सुरुवातीच्या सर्व अंदाजावरून स्पष्ट होताना दिसत असून एनडीएतील भाजपा आणि जनता दल युनायटेड या दोन पक्षांनी प्रचंड यश मिळविले आहे. गेल्या वेळच्या निवडणुकीतील निकालाच्या तुलनेत यंदा आणखी घवघवीत यश एनडीएला मिळताना दिसत आहे. महिलांनी केलेले भरघोस मतदान, नीतिश कुमार यांच्यावर असलेला विश्वास, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वादळी सभा, जंगलराजबद्दल लोकांच्या मनात असलेली प्रचंड चीड, विकासाचे राजकारण, वोटचोरीच्या आरोपांना मतदारांनी थारा न देण्याचा केलेला निश्चय या सगळ्याचा एकत्रित परिणाम या निवडणुकीत झाल्याचे म्हटले जात आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी २४३ जागांवर झालेल्या मतदानाचे निकाल येऊ लागले आहेत. काँग्रेस-आरजेडीच्या महाआघाडीचा निवडणुकीत पुरता सुपडा साफ झाल्याचे तूर्तास दिसत आहे. महिलांसाठी जीविका योजना या निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली. त्यातून महिलांनी या निवडणुकीत भरघोस मतदान केले. तब्बल ७० टक्के मतदान महिलांनी या निवडणुकीत केले. यामुळे १०व्यांदा मुख्यमंत्री होण्याचा मान नीतिशकुमार यांना मिळणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत अनेक सुधारणाही करण्यात आल्या. त्यामुळेच हिंसा मुक्त मतदान झाल्याचं दिसून आलं.
१९८५ पासून ते २००५ च्या काळातील राष्ट्रीय जनता दलाच्या सरकारला भाजप आणि जेडीयूकडून जंगलराज संबोधले गेले होते. तेव्हा निवडणुकांत हिंसाचार ही नेहमीचीच बाब ठरली होती. मतमोजणीही पुन्हा पुन्हा करण्याची वेळ येत असे. पण २०२५मध्ये एकही हिंसा झाली नाही. १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत मोठी हिंसा झाली होती. त्यात ६५ लोकांचा मृत्यू झाला होता. निवडणूक आयोगाला १५६ जागांवर पुन्हा मतदान करावं लागलं होतं. तर १९९०च्या विधानसभा निवडणुकीतही हिंसेची पुनरावृत्ती झाली तेव्हा ८७ लोकांना प्राण गमवावे लागले होते. १९९०मध्ये लालू प्रसाद यादव पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले होते.
हे ही वाचा:
अल फलाह विद्यापीठात आरोपी मुजम्मिलचे पाचवेळा नमाज पठण
जनतेने ‘सुशासना’वर केले शिक्कामोर्तब
आयुर्वेदात कडूलिंबाचे महत्व जाणून घ्या !
डी-गँगच्या ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश! सेलिब्रिटी जात होते पार्ट्यांना
एसआयआरचं यश
एसआयआरच्या माध्यमातून निवडणूक आयोगाने मतदारयाद्या स्वच्छ करण्याचा निश्चय केला. त्यात त्यांना यश आले आणि त्याचे परिणामही निवडणुकीवर झाल्याचे दिसून आले. विरोधकांनी मात्र त्याला विरोध केला. पण लोकांनी या विरोधाला थारा दिलेला नाही.
१९९५ मध्ये निवडणुकीची घोषणा होताच संपूर्ण राज्यात प्रचंड हिंसा झाली. मतदानाच्या दिवशी प्रचंड गडबड करण्यात आली. अनेक मतदान केंद्रावर हिंसा झाली. हिंसाचारामुळे तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त टीएन शेषन यांनी एकदा दोनदा नाही तर चार वेळा निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. बिहारमध्ये तो काळ अराजकतेचा होता. त्यानंतर टीएन शेषन यांनी निवडणूक प्रक्रियेत अनेक सुधारणा घडवून आणल्या. कर्तव्यदक्ष आणि कठोर निवडणूक आयुक्त म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले.
२००५ नंतर नितीश कुमारच मुख्यमंत्री
२००० मधील विधानसभा निवडणुकीत फार हिंसा झाली नाही. २००५ची विधानसभा निवडणुकीलाही हिंसेचं गालबोट लागलं. यावर्षी बिहारमध्ये दोनदा मतदान झालं. ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या मतदानानंतर नितीश कुमार मुख्यमंत्री बनले ते आजतागायत मुख्यमंत्री आहेत.







