29 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरराजकारणत्या मंत्र्यांनी सत्तेत नाही, तुरुंगात असले पाहिजे

त्या मंत्र्यांनी सत्तेत नाही, तुरुंगात असले पाहिजे

मोदींनी केली विरोधकांवर टीका

Google News Follow

Related

शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर तीव्र टीका केली. गंभीर आरोपांखाली अटक झालेल्या नेत्यांना पदांवरून हटवण्यासंदर्भात आणलेल्या नव्या विधेयकाला तृणमूलचा विरोध असल्याचे नमूद करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “अशा मंत्र्यांनी सत्तेत नसून तुरुंगात असले पाहिजे.” त्यांनी राज्यातील जनतेला आगामी निवडणुकांत भाजपाला मतदान करून ‘परिवर्तन’ (Poribortan) घडवून आणण्याचे आवाहन केले.

मोदी म्हणाले, जर एखादा पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्री तुरुंगात गेला, तर त्याला पदावरून हटवण्यासाठी कायद्यात कोणतीही तरतूद नाही. आणि बघा किती निर्लज्जपणे लोक तुरुंगातून सरकार चालवतात. तृणमूलचा एक मंत्री अद्याप शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात आहे, तरीही त्याने आपले पद सोडण्यास नकार दिला.”

हा हल्ला त्यांनी अप्रत्यक्षपणे सुधारगृह खात्याचे मंत्री चंद्रनाथ सिन्हा यांच्यावर केला.

हे ही वाचा:

भारताने गुंडाळले, नो फर्स्ट यूज धोरण?

हैदराबादच्या गणेशोत्सवात “ऑपरेशन सिंदूर” थीमवरील गणेशमूर्तीचं आकर्षण!

“ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्याने मुंबईतील समीकरणं बदलणार नाहीत”

“डी.के. शिवकुमार कर्नाटकाचे मोठे कलाकार, त्यांना गांभीर्याने घेऊ नका”

मोदींचा हा हल्ला बिहार दौर्‍यात आरजेडीवर केलेल्या टीकेनंतर काही तासांतच झाला. त्यांनी पुढे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना निवडणूक लढवण्यास बंदी घालणाऱ्या प्रस्तावित विधेयकाला पाठिंबा देत म्हटले की, कोणीही तुरुंगातून आदेश देऊ शकत नाही. पण काही पक्ष लोकांना फक्त मतदार मानतात, त्यांच्या आकांक्षा, सन्मान आणि विकासाकडे दुर्लक्ष करतात.”

केंद्राचे नवीन विधेयके

केंद्र सरकारने नुकतेच संविधान (१३० वा दुरुस्ती विधेयक), केंद्रशासित प्रदेश सुधारणा विधेयक आणि जम्मू-काश्मीर पुनर्गठन (दुरुस्ती) विधेयक २०२५ मांडले आहेत. यानुसार, पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्री जर पाच वर्षांपेक्षा जास्त शिक्षेच्या गुन्ह्याखाली किमान ३० दिवस तुरुंगात राहिला, तर त्याला पदावरून हटवण्याची तरतूद होईल.

तृणमूलने मोदींच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना २०१६ च्या कथित नारदा स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ दाखवला, ज्यात भाजप नेते सुवेंदु अधिकारी रोख पैसे घेताना दिसत असल्याचा दावा केला.

तृणमूलचे माजी खासदार कुणाल घोष म्हणाले, काचेच्या घरात बसून तो शाप देतो. तो स्वतः चोराच्या शेजारी बसतो (सुवेंदु अधिकारी). जे बंगालचा अपमान करतात, त्यांना तो चोरांच्या शेजारी स्टेजवर बसवतो.

कोलकात्यातील मोदींचा दौरा व विकास प्रकल्प

पंतप्रधान मोदींनी कोलकात्यातील तीन नवीन मेट्रो मार्गांचे उद्घाटन केले –

  • नोपारा – जय हिंद विमानबंदर
  • सियालदह – एस्प्लानेड
  • बेळेघाटा

मोदींनी जाहीर सभेत ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला “बंगालच्या विकासाचा शत्रू” असे संबोधले. ते म्हणाले की, TMC चे एकमेव उद्दिष्ट म्हणजे भाजपाची वाढ थांबवणे.

त्यांनी अलीकडच्या काही महिलांवरील हल्ल्यांचा, विशेषतः RG कर बलात्कार व खून प्रकरणाचा, उल्लेख करत ममता सरकारवर कायदा व सुव्यवस्थेच्या बिघडलेल्या परिस्थितीवर जोरदार हल्ला चढवला.

मोदी म्हणाले, राज्यात महिलांवर होणारे अत्याचार वाढले आहेत. गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार हे TMC सरकारची ओळख बनले आहे. जोपर्यंत TMC सत्तेत आहे, तोपर्यंत विकास होणार नाही. खरी बदलाची वेळ तेव्हाच येईल, जेव्हा TMC ला सत्तेतून हटवले जाईल.

केंद्राकडून मिळालेल्या निधीबाबत मोदींचे स्पष्टीकरण

बंगाल सरकारने केंद्राकडून कमी निधी मिळाल्याचा दावा पुन्हा एकदा मोदींनी फेटाळून लावला. ते म्हणाले, युपीए सरकारच्या तुलनेत आम्ही रस्ते जोडणीसाठी तीन पट जास्त निधी बंगालला दिला आहे. रेल्वे प्रकल्पांनाही तितकाच पैसा दिला आहे. पण अडथळा राज्य सरकारकडूनच निर्माण होतो. आम्ही पाठवलेला बहुतांश पैसा राज्यात लुटला जातो. तो पैसा सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही, तर तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर खर्च होतो. म्हणूनच गरीबांच्या उन्नतीसाठीचे काम मागे पडते.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा