28.7 C
Mumbai
Wednesday, October 28, 2026
घरविशेषहैदराबादच्या गणेशोत्सवात "ऑपरेशन सिंदूर" थीमवरील गणेशमूर्तीचं आकर्षण!

हैदराबादच्या गणेशोत्सवात “ऑपरेशन सिंदूर” थीमवरील गणेशमूर्तीचं आकर्षण!

सोशल मिडीयावर फोटो व्हायरल, सर्वांना उत्सुकता 

Google News Follow

यंदाच्या गणेश चतुर्थीमध्ये हैदराबादमध्ये एक आगळीवेगळी मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे. भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ वर आधारित गणपतीची मूर्ती या वर्षीच्या उत्सवात साकारण्यात आली आहे. ही मूर्ती देशभक्ती आणि शौर्याचा संदेश देणारी ठरणार असून, गणेशोत्सवाच्या धार्मिक उत्साहासोबतच देशासाठी लढणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी आहे.

वायू दलाच्या जवानाच्या मूर्तीरुपात असणारा हा बाप्पा लवकरच आपल्या भक्तांना भेटायला येणार आहे. मृषकराज  देखील जवानाच्या मूर्तीरुपात आहेत. यासह भारतीय सैनिक, हेलिकॉप्टर आणि बचाव कार्याचे दृश्य साकारण्यात आले आहे. भारताचे घातक ब्रह्मोस क्षेपणास्त्र देखील दाखवण्यात आले आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’ ही थीम वापरून अनेक ठिकाणी भारतीय लष्कराच्या पराक्रमाची झलक दाखवण्यात आली आहे. मूर्तीच्या पार्श्वभूमीत हिमालयातील भाग आणि धोकादायक परिस्थितीतून बचाव करत असलेल्या जवानांचे चित्रण करण्यात आले आहे. आयोजकांचे म्हणणे आहे की, “गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सण नसून समाजप्रबोधन आणि देशप्रेम जागवण्याचीही संधी आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ने देशाला अभिमान वाटावा असा संदेश द्यायचा आहे.”

हैदराबादमधील या खास गणेश मूर्तीमुळे स्थानिकांमध्ये आणि पर्यटकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. सोशल मीडियावरही याची छायाचित्रं आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा