24 C
Mumbai
Tuesday, December 9, 2025
घरदेश दुनियाऑपरेशन गंगामुळे २२ हजाराहून अधिक नागरिक परतले भारतात

ऑपरेशन गंगामुळे २२ हजाराहून अधिक नागरिक परतले भारतात

Google News Follow

Related

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन गंगा’ सुरु करून युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना भारतात सुखरूप आणण्याचे काम करत आहे.

या दरम्यान आज परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संसदेत ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत बाहेर काढण्यात आलेल्या भारतीयांची तपशीलवार माहिती दिली आहे. राज्यसभेत जयशंकर म्हणाले की, युक्रेनमध्ये गंभीर संघर्ष सुरु असतानाही भारताने ऑपरेशन गंगा अंतर्गत सुमारे २२ हजार ५०० भारतीय नागरिक सुरक्षितपणे भारतात परत आणले आहे.

परराष्ट्र मंत्री म्हणाले की, युद्ध सुरु झाले तेव्हा युक्रेनमध्ये सुमारे २२ हजार भारतीय नागरिक होते. ज्यापैकी १८ हजारापेक्षा जास्त विद्यार्थी होते. रशियन आक्रमण सुरू झाले तेव्हा सुमारे १६ हजार भारतीय नागरिक युक्रेनमध्ये उपस्थित होते. त्यानंतर ५ मार्चपर्यंत, सुमारे १८ हजार लोकांनी युक्रेनची सीमा ओलांडली आणि शेजारच्या देशांमध्ये स्थलांतर केले. ६ मार्चपर्यंत जवजजवळ ७६ फ्लाइट्समधून सुमारे १६ हजार भारतीयांना भारतात आणण्यात आले होते. अर्ध्याहून अधिक विद्यार्थी पूर्व युक्रेनमधील विद्यापीठांमध्ये होते. जो रशियाच्या सीमेला लागून आहे आणि आतापर्यंत संघर्षाचा केंद्रबिंदू आहे. भारत सरकारने भारतातील ३५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील विद्यार्थ्यांना यशस्वीरित्या बाहेर काढले आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदी म्हणतात की, काश्मीर फाइल्ससारखे चित्रपट बनत राहिले पाहिजेत!

‘या’ कारणासाठी मालदीवने मानले भारताचे आभार!

डेरवण युथ गेम्स : ‘अपयशातूनच होते यशाची निर्मिती’

‘तांत्रिक बिघाडामुळेच पाकिस्तानमध्ये मिसाईल घुसली’

“ऑपरेशन गंगा” मोहिमेचा आढावा पंतप्रधान मोदी स्वतः दैनंदिन आधारावर घेत आहेत. परराष्ट्र मंत्रालयात, आम्ही 24X7 आधारावर निर्वासन कार्यांवर लक्ष ठेवत आहोत. आम्हाला नागरी विमान वाहतूक मंत्रालय, संरक्षण, NDRF, IAF, खाजगी विमान सेवा यासह सर्व संबंधित मंत्रालये आणि संस्थांकडून उत्कृष्ट समर्थन आणि सहकार्य मिळाले आहे. असेही परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सांगितले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा