28 C
Mumbai
Monday, September 7, 2026
घरराजकारणराहुल गांधी आता बोला...काँग्रेसच्या राज्यातले मौलवी म्हणाले, महिलांनी चार भिंतीत राहावे!

राहुल गांधी आता बोला…काँग्रेसच्या राज्यातले मौलवी म्हणाले, महिलांनी चार भिंतीत राहावे!

काँग्रेसशासित केरळममध्ये व्यक्त केलेल्या भूमिकेमुळे फुटले चर्चेला तोंड

Google News Follow

Related

विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी भारतातील तथाकथित पितृसत्ताक पद्धतीवर बोलताना मनुस्मृतीवर टीका केली होती. महिलांना कसे दुय्यम स्थान पितृसत्ताक पद्धतीत, मनुस्मृतीत दिले जाते, अशी वक्तव्ये करत राहुल गांधींनी थयथयाट केला होता. पण आता काँग्रेसची सत्ता असलेल्या केरळममध्ये मात्र राहुल गांधींनाच आव्हान मिळाले आहे. तिथे सुन्नी धर्मगुरू मुफ्ती शेख अबूबकर अहमद यांनी महिला या सोन्याच्या दागिन्यांसारख्या आहेत, त्यांना चार भिंतीतच ठेवले पाहिजे, असे विधान केले आहे.

मुफ्ती यांच्या या विधानामुळे आता काँग्रेस नेते राहुल गांधी हे काय भाष्य करणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. राहुल गांधी यांनी पुण्यातील छात्रो की गूँज या कार्यक्रमात पितृसत्ताक पद्धतीवर भाष्य केले होते आणि हिंदू ग्रंथ मनुस्मृतीतून महिलांना दुय्यम स्थान देण्यात येते असेही म्हटले होते. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसकडून मनुस्मृतीवर टीका केली जात आहे. आता मुफ्ती यांच्या आणि तेही काँग्रेसशासित राज्यात केलेल्या विधानानंतर काँग्रेस कोणती भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

केरळमधील इस्लामी धर्मगुरू आणि ‘ग्रँड मुफ्ती ऑफ इंडिया’ अशी ओळख असलेले शेख अबूबकर अहमद यांनी महिलांच्या सार्वजनिक सहभागाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. महिलांनी घराच्या चार भिंतींतच राहावे, असे त्यांनी म्हटले असून महिलांची तुलना सोन्याच्या दागिन्यांशी केली आहे. कोची येथे आयोजित इस्लामी परिषदेत बोलताना अबूबकर अहमद यांनी कुराणचा हवाला देत महिलांनी घरातच राहावे आणि सार्वजनिक ठिकाणी येऊ नये, असा दावा केला.

हे ही वाचा:

दीप्ती शर्माचा विक्रम; सर्वाधिक विकेट्सचा मान!

घरातल्या निवडणुकीत जिंकता येत नाही, त्यांना पंतप्रधानांची उठाठेव!

भारताविरुद्ध मालिकेसाठी बांगलादेश उत्सुक

‘कॉक्रोच’च्या मोर्चाविरोधात आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

“महिलांना अशा प्रकारे सार्वजनिक व्यासपीठावर आणल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो, हे लक्षात घेऊनच इस्लाममध्ये महिलांसाठी पडदा पद्धतीची तरतूद करण्यात आली आहे,” असे त्यांनी म्हटल्याचे वृत्तसंस्थेने नमूद केले आहे. महिलांची तुलना सोन्याच्या दागिन्याशी करताना ते म्हणाले की, हाराची चमक आणि सौंदर्य टिकवायचे असेल तर तो सुरक्षितपणे पेटीत ठेवावा लागतो. त्याचप्रमाणे महिलांनाही सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना घरातच ठेवले पाहिजे, असा युक्तिवाद त्यांनी केला.

यासाठी त्यांनी दगडी जात्यासारख्या वस्तूचे उदाहरणही दिले. अशा वस्तू रस्त्याच्या कडेला ठेवल्या तरी त्यांना फारशी काळजी घेण्याची गरज नसते. मात्र, सोन्याचा हार रस्त्यावर ठेवला तर ये-जा करणारे लोक त्याला स्पर्श करतील आणि त्यामुळे त्याचे नुकसान होईल, असे त्यांनी सांगितले. त्यांचे हे वक्तव्य महिलांना सार्वजनिक व्यासपीठावर सहभागी होण्यापासून रोखण्यासंदर्भात नुकत्याच जारी करण्यात आलेल्या एका परिपत्रकाच्या पार्श्वभूमीवर आले आहे. या परिपत्रकावर विविध महिला नेत्यांनी टीका केली होती.

कंठापूरम गटाच्या समस्त केरळ जमीयतुल उलमा या सुन्नी-शाफी विद्वानांच्या संघटनेने अलीकडेच धार्मिक कार्यक्रम आणि उत्सवांमध्ये महिलांच्या सार्वजनिक सहभागाबाबत काही मर्यादा सुचवल्या होत्या. अबूबकर अहमद यांनी या भूमिकेचे समर्थन करताना सांगितले की, अशा प्रकारचे विचार गेल्या शंभर वर्षांपासून धार्मिक विद्वानांकडून मांडले जात आहेत. धर्माचा अभ्यास केलेल्या विद्वानांनी या विषयावर बोलणे आपले कर्तव्य मानले पाहिजे आणि विरोध झाला तरी ते आपली भूमिका मांडत राहतील, असेही त्यांनी म्हटले.

कोण आहेत शेख अबूबकर अहमद?

शेख अबूबकर अहमद हे भारतातील आणि दक्षिण आशियातील सुन्नी इस्लाममधील प्रभावशाली धार्मिक व्यक्तिमत्त्व मानले जातात. त्यांना ‘भारताचे ग्रँड मुफ्ती’ म्हणून संबोधले जाते. मात्र, हे पद भारत सरकारने अधिकृतपणे मान्य केलेले पद नाही. ‘मुफ्ती’ म्हणजे इस्लामी धार्मिक कायद्याचा अभ्यासक किंवा तज्ज्ञ.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
330,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा