उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत प्रवेश केल्यापासून त्यांच्यावर काँग्रेसच्या विचारांचा पगडा बसल्याचा आरोप होतो आहे. सध्या उद्धव ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत, तिथे एका स्थानिक महिलेने उद्धव ठाकरे मंचावर उपस्थित असताना केलेल्या भाषणाचा व्हीडिओ चर्चेत आहे.
ही मुस्लिम महिला त्या व्हीडिओमध्ये बोलताना दिसते की, काही दिवसांत भारताची स्थिती नेपाळसारखी होईल. देशात टीव्हीवर रामायण दाखविण्याऐवजी संविधान दाखवले पाहिजे. मग लोक आपले निर्णय योग्यपद्धतीने घेऊ शकतील. आपल्याला अशा परिस्थितीत कुणाला साथ द्यायचा याचा विचार करायला हवा.
हे ही वाचा:
वक्फ कायद्याच्या नावाखाली दिशाभूल करणे थांबवा
पश्चिम आफ्रिकन देश असलेल्या मालीमध्ये पाच भारतीय नागरिकांचे अपहरण
विचारवंत, संघटक आणि कर्मयोगी श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी
“धार्मिक मुस्लिम हे करू शकत नाही…” म्हणत अबू आझमी यांचा वंदे मातरम गाण्यास नकार
उद्धव ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना शासनातर्फे जाहीर झालेली मदत मिळालेली आहे अथवा नाही, हे पाहण्यासाठी या दौऱ्यावर आपण जात आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.
हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत असून हिंदुत्व सोडले नसल्याचा दावा करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यासमोर एक महिला रामायण टीव्हीवर दाखवू नका, त्याऐवजी संविधान दाखवा अशी भूमिका कशी काय मांडते, असा सवाल उपस्थित केला जात आहे.







