32 C
Mumbai
Monday, December 8, 2025
घरविशेष“धार्मिक मुस्लिम हे करू शकत नाही...” म्हणत अबू आझमी यांचा वंदे मातरम...

“धार्मिक मुस्लिम हे करू शकत नाही…” म्हणत अबू आझमी यांचा वंदे मातरम गाण्यास नकार

भाजपाकडून निदर्शेने

Google News Follow

Related

समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष अबू आझमी यांनी ‘वंदे मातरम्’ म्हणण्यास नकार दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण होत झालेली असताना आता हा वाद निर्माण झाला आहे. अबू आझमी यांनी वंदे मातरम या गीताच्या सामुहिक पठणाला उपस्थित राहण्यास नकार दिल्याने या वादाला हवा मिळाली. यानंतर त्यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर अनेक भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.

वंदे मातरम् म्हणण्यास नकार देण्याच्या निषेधार्थ निदर्शने करणाऱ्यांना प्रतिक्रिया देताना अबू आझमी म्हणाले की, “तुम्ही एखाद्याला जबरदस्तीने काहीतरी म्हणायला लावू शकत नाही. जो फक्त अल्लाहवर विश्वास ठेवतो आणि आपल्या आईचीही पूजा करत नाही तो इस्लामनुसार पृथ्वी आणि सूर्याची पूजा करू शकत नाही.” पुढे ते म्हणाले की, ते वंदे मातरमचा आदर करतात आणि लोकांनी हे गीत म्हणण्यास त्यांना कोणताही आक्षेप नाही. “ज्यांना पठण करायचे आहे ते करू शकतात, कोण आक्षेप घेत आहे? बरेच मुस्लिम देखील हे गाणे पठण करतात परंतु जे धार्मिक आहेत आणि अल्लाहवर विश्वास ठेवतात ते इतर कोणाचीही पूजा करू शकत नाहीत,” असे अबू आझमी म्हणाले.

दरम्यान, मुंबईतील वांद्रे येथील आझमी यांच्या निवासस्थानाबाहेर अनेक भाजप नेत्यांनी ‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता की जय’ च्या घोषणा दिल्या. भाजप आमदार राज के पुरोहित म्हणाले की, हा निषेध प्रतीकात्मक होता. “वंदे मातरम म्हणायला हवा आणि देशाचा आदर करायला हवा. जर तुम्हाला देशाबद्दल प्रेम नसेल, तर पाकिस्तानला जा. तुम्ही या देशात राहता आणि इथे आमदार आहात.

हे ही वाचा:

उज्जैनमधील मशीद पाडण्याविरुद्ध दाखल केलेली याचिका फेटाळली; प्रकरण काय?

मोदीजी तुम्ही इतके ‘ग्लो’ कसे काय करता?

पुढील वर्षी ट्रम्प भारत दौऱ्यावर? काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?

औषधांपेक्षा कमी नाही देशी गुलाब

मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी अबू आझमी यांना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ होणाऱ्या वंदे मातरमच्या सामूहिक पठणासाठी त्यांना आमंत्रित केले होते. “तुम्हाला आमंत्रण आहे. वंदे मातरम हे राष्ट्रवाद, एकता आणि प्रेरणेचे प्रतीक आहे. तुम्हाला इतरांसोबत हे गाणे म्हणण्यासाठी आमंत्रित केले आहे,” असे त्यांनी गुरुवारी एका ट्विटमध्ये म्हटले होते. यापूर्वी, अबू आझमी यांनी शाळांमध्ये वंदे मातरम अनिवार्य करण्यास विरोध केला होता, ते म्हणाले होते की ते लोकांवर सक्ती केली जाऊ शकत नाही कारण वेगवेगळ्या धर्मांच्या लोकांचे त्याच्या पठणाबद्दल वेगवेगळे मत असू शकते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा