कर्नाटकमध्ये नव्या वादाला तोंड फुटले असून विमानतळावर नमाज पठण करण्यावरून हा वाद निर्माण झाला आहे. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल- २ मध्ये नमाज पठण करणाऱ्या लोकांचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता राजकीय वाद निर्माण झाला आहे. सार्वजनिक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांबाबत राज्य सरकारच्या भूमिकेवर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
कर्नाटक भाजपने बंगळूरू विमानतळ परिसरात नमाज पठण केल्यावरून सरकारवर टीका केली आहे. उच्च सुरक्षा क्षेत्रात अशा कृत्याला परवानगी कशी दिली गेली, असा प्रश्न उपस्थित केला आहे. पक्षाचे प्रवक्ते विजय प्रसाद यांनी काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि आयटी मंत्री प्रियांक खरगे यांच्याकडून या कथित मंजुरीबद्दल स्पष्टीकरण मागितले आहे. “या व्यक्तींनी उच्च सुरक्षा असलेल्या विमानतळ क्षेत्रात नमाज पठण करण्यासाठी पूर्वपरवानगी घेतली होती का? संबंधित अधिकाऱ्यांकडून परवानगी घेतल्यानंतर जेव्हा आरएसएस पाठ संचलन आयोजित करते तेव्हा सरकार आक्षेप का घेते, परंतु प्रतिबंधित सार्वजनिक क्षेत्रात अशा उपक्रमांकडे का डोळेझाक करते?” असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत. एवढ्या संवेदनशील क्षेत्रात ही गंभीर सुरक्षा चिंता निर्माण करत नाही का? असा सवालही त्यांनी विचारला आहे.
How is this even allowed inside the T2 Terminal of Bengaluru International Airport?
Hon’ble Chief Minister @siddaramaiah and Minister @PriyankKharge do you approve of this?Did these individuals obtain prior permission to offer Namaz in a high-security airport zone?
Why is it… pic.twitter.com/iwWK2rYWZa— Vijay Prasad (@vijayrpbjp) November 9, 2025
भाजपने राज्य सरकारवर तुष्टीकरणाचे राजकारण केल्याचा आरोप केला आणि दावा केला की ते काही क्रियाकलापांकडे दुर्लक्ष करते तर काहींवर कठोर निर्बंध लादते. पक्षाने विमानतळ अधिकाऱ्यांच्या मौनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि सर्व समुदायांमध्ये नियम समान रीतीने लागू केले पाहिजेत असा आग्रह धरला.
हे ही वाचा:
अमेरिकन व्यक्तीला २,००० डॉलर्स मिळणार!
मुस्लिम, ख्रिश्चनांसाठी संघाचे दरवाजे उघडे, पण भारतमातेचे पुत्र म्हणून या!
वैश्विक आर्थिक वाढीत भारताचा वाटा ८-१० टक्के
कोरड्या त्वचेतून कसा मिळतो आराम
नमाज पठण करताना दिसणारे लोक हे मक्काला जाणाऱ्या प्रवाशांचे नातेवाईक असल्याचे वृत्त आहे. टर्मिनलच्या आत एक नियुक्त प्रार्थना कक्ष असूनही, त्यांनी सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण केले. व्हायरल फुटेजमध्ये विमानतळ कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी जवळच दिसत आहेत.







