28 C
Mumbai
Tuesday, September 27, 2022
घरराजकारण“दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंकडे बोलण्यासारखं काय आहे?”

“दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंकडे बोलण्यासारखं काय आहे?”

Related

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. दसरा मेळावा घेऊन त्यात उद्धव ठाकरे काय बोलणार आहेत? असा खोचक सवाल नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.

भाजपा नेते आणि खासदार निलेश राणे यांच्यावतीने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ‘मोदी एक्स्प्रेस’ सोडली आहे. यावेळी नारायण राणे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घाणाघाती टीका केली आहे. “दसरा मेळावा घेऊन बोलण्यासारखं आता त्यांच्याकडे उरले तरी काय?” असा प्रश्न विचारला आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना संपली असून एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचं नारायण राणे म्हणाले.

शिवसेनेकडे आमदार राहिलेच नाही. शिवसेनेतील ४० हून अधिक आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. तर, उरलेले काहीजण शिंदे यांच्याकडे जाण्याच्या तयारीत असल्याचेही राणे यांनी म्हटले.

खरी गद्दारी उद्धव ठाकरे यांनी केली आणि त्यांनी मुख्यमंत्रीपद हे गद्दारी करून मिळवलं असल्याची टीका नारायण राणे यांनी केली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी जी कामं केली ती आपल्या निकटवर्तीयांसाठी केली असा आरोपही नारायण राणे यांनी केला.

हे ही वाचा:

एकनाथ शिंदे यांच्यामुळे मेट्रो धावणार आहे

चित्रदुर्ग मठाच्या पुजाऱ्यावर लैंगिक छळाचे आरोप

वरळी नाक्याच्या बाप्पाचा रथ खेचला मुस्लिम बांधवांनी

निधी देण्यासाठी मिटकरी कमिशन मागतात, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा आरोप

दरम्यान, गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई ते कुडाळ दरम्यान निलेश राणे यांनी ट्रेन सोडली. तसेच कोकणासाठी काम करत राहणार असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,966चाहतेआवड दर्शवा
1,942अनुयायीअनुकरण करा
40,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा