28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरराजकारण‘इंडी’ गटात सावळा गोंधळ; जम्मू काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती विरुद्ध फारुख अब्दुल्ला

‘इंडी’ गटात सावळा गोंधळ; जम्मू काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती विरुद्ध फारुख अब्दुल्ला

जम्मू काश्मीरमध्येही ‘इंडी’ आघाडीत फूट पडल्याचे चित्र

Google News Follow

Related

लोकसभा निवडणूक जवळ आली असून आता राजकीय वर्तुळात देखील हालचालींना वेग आला आहे. भाजपाला टक्कर देण्यासाठी म्हणून विरोधकांनी तयार केलेली ‘इंडी’ आघाडी अद्याप काही राज्यांमध्ये जागा वाटपाचा तिढा सोडवताना दिसत आहे तर, काही राज्यांमध्ये या आघाडीतील घटक पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढण्याची भूमिकाही घेतली आहे. अशातच आता जम्मू काश्मीरमध्येही ‘इंडी’ आघाडीत फूट पडल्याचे चित्र आहे.

नॅशनल कॉन्फरन्सने (एनसी) जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग-राजौरी मतदारसंघातून पक्षाचे ज्येष्ठ नेते मियां अल्ताफ अहमद लाहरवी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीसोबत (पीडीपी) युती होण्याची शक्यता आता जवळजवळ संपुष्टात आली आहे. त्यातही विशेष म्हणजे हे दोन्ही पक्ष ‘इंडी’ आघाडीचे घटक पक्ष आहेत. हा मतदार संघ पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांचा गृह मतदारसंघ आहे. २०१४ मध्ये अनंतनागमधून विजयी झालेल्या मेहबूबा आणि त्यांचे वडील आणि पीडीपीचे संस्थापक मुफ्ती मोहम्मद सईद या दोघांनीही संसदेत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

दुसरीकडे, मियां अल्ताफ अहमद लाहरवी हे मध्य काश्मीरमधील कंगनचे पाच वेळा आमदार राहिले आहेत. त्यांनी फारुख आणि ओमर अब्दुल्ला यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले आहे. उमेदवारीची घोषणा करताना ओमर म्हणाले, “अनंतनाग-राजौरी जागेसाठी मियांसाहेबांपेक्षा चांगला उमेदवार नाही. लोक त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीशी परिचित आहेत. त्यांनी कधीही धर्म किंवा जातीच्या आधारावर मते मागितली नाहीत, सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.”

हे ही वाचा:

अन्सारीच्या मृत्यूनंतर तुरुंग अधीक्षकाला जीवे मारण्याची धमकी!

माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काश्मीरमध्ये ३७० कलम लावून घोडचूक केली!

‘नावे बदलल्याने काही फरक पडत नाही’

अनियमित व्यवहार, नियमभंगामुळे काँग्रेसला साडेतीन हजार कोटींचा कर

नॅशनल कॉन्फरन्स काश्मीर खोऱ्यातील लोकसभेच्या तिन्ही जागा लढवू इच्छित आहेत आणि त्यावर ठाम राहण्याच्या निर्णयामुळे खोऱ्यातील राजकीय पक्षांची युती असलेल्या पीपल्स अलायन्स फॉर द गुपकर डिक्लेरेशनवर (PAGD) प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पीडीपीने मेहबूबा यांच्या उमेदवारीची औपचारिक घोषणा केलेली नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा