28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
घरराजकारण“मुख्यमंत्र्यांनी एकदा दिखाव्यासाठी तरी हनुमान चालीसा वाचावी”

“मुख्यमंत्र्यांनी एकदा दिखाव्यासाठी तरी हनुमान चालीसा वाचावी”

Google News Follow

Related

हनुमान चालीसा पठणाच्या मुद्द्यावरून राज्यातलं राजकारण तापले होते. खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुंबईत अटक देखील करण्यात आली होती. आता त्यांची जामिनावर सुटका झाली असून ते नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. नागपूरमध्ये राणा दाम्पत्याने मंदिरात हनुमान चालीसा पठण केले असून त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

“मंदिरात हनुमान चालीसा पठण करणार म्हटल्यावर आम्हाला नागपूर विमानतळावर अडवण्यात आल्याचा दावा नवनीत राणा यांनी केला. ३६ दिवसांनंतर जेव्हा आम्ही नागपूरमध्ये येतोय. मंदिरात दर्शन करण्यासाठी जात आहोत, तेव्हा इथे एवढी सेक्युरिटी ठेवली आहे. देवाचा एवढा विरोध महाराष्ट्रात का आहे? उद्धव ठाकरेंना दुसरं काम राहिलेलं नाही का? हा शनी लवकरात लवकर महाराष्ट्रातून दूर झाला पाहिजे यासाठी दररोज हनुमान चालीसा आणि आरती करणार आहे,” असा टोला नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

“महाराष्ट्राचं संकट दूर व्हावं यासाठी सगळ्यांनी आराधना करायला हवी. महाराष्ट्राला लागलेला शनी लवकरात लवकर दूर व्हायला हवा”, अशी टीका नवनीत राणा यांनी केली आहे. “मुख्यमंत्र्यांनी एकदा दिखाव्यासाठी का होईना हनुमान चालीसा वाचावी” असा खोचक सल्ला नवनीत राणा यांनी दिला आहे.

हे ही वाचा:

मला खोट्या केसेसमध्ये गुंतवण्याचा डाव, अमित साटम यांचा दावा

‘हिंदुत्व धर्म नही इतिहास है’! ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

प्रियांका गांधी दिसणार राज्यसभेत?

जवानांना घेऊन जाणारी बस नदीत पडली, ७ जवान मृत

“ही सगळी नेहमीची प्रक्रिया आहे. आम्ही जिथे जिथे पोहोचतो, तिथे मुख्यमंत्री पूर्ण ताकद लावतात. आम्हाला परवानगी नाकारणे, ताब्यात घेणे असे प्रकार सुरू आहेत. हा सगळा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अहंकार आहे. राज्याची जनता हे पाहात आहे. हनुमानाचं नाव घेणाऱ्यांना जेलमध्ये टाकलं जातंय. मुख्यमंत्र्यांमध्ये आलेला हा अहंकार मोडून काढण्याचं काम राज्यातील हनुमान भक्त करतील,” अशी टीका रवी राणा यांनी केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा