36 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरराजकारणशिंगणेंच्या खुलाशाने नवाब मलिक यांचा खोटारडेपणा उघड

शिंगणेंच्या खुलाशाने नवाब मलिक यांचा खोटारडेपणा उघड

Google News Follow

Related

“देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठीच रेमडेसेवीर इंजेक्शन्स आणली होती.” अशी कबुली, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिलेल्या कबुलीनंतर भाजपाचे आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी ट्विट्स करून राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना लक्ष्य केलं आहे. एवढंच नाही तर त्यांनी डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे ‘आभारही’ मानले आहेत.

“मलिक आता तरी तोंड काळे करा. नवाब मलिकांनी रेमदेसीवीर वरून केलेले आरोप भाजपा द्वेषातून केले होते ही बाब मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या विधानावरून स्पष्ट झाली आहे. रेमदेसीवीरबाबत भाजपाने त्यांच्याशी बोलणे केले होते, हा स्टॉक राज्य सरकार साठीच मागवला होता हे त्यांनी कबूल केले.” असं ट्विट अतुल भातखालकरांनी केलं आहे. याशिवाय, “जावयाला अटक झाल्यापासून नवाब मलिक पिसाळले आहेत असे देवेंद्र फडणवीसजी म्हणाले होते. डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या ताज्या विधानानंतर यावर शिक्कामोर्तब झाले आहे.” असेही भातखळकर म्हणाले.

“डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे मनापासून अभिनंदन. त्यांनी रेमदेसीवीरचे सत्य सांगितल्यामुळे नवाब मलिक, प्रियांका वाडरा, साकेत गोखले, आव्हाड या सगळ्या खोटरड्यांचे पितळ उघडे पडले.” असेही भातखळकर म्हणाले.

ब्रुक फार्मा या औषध उत्पादक कंपनीच्या राजेश जैन यांना शनिवारी रात्री बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील पोलीसांनी ताब्यात घेतले. दहा पोलीस अधिकारी हे रात्री त्यांच्या घरी गेले आणि त्यांना ताब्यात घेतले गेले. यावेळी ताब्यात घेण्याचे कोणतेही ठोस कारण सांगण्यात आले नाही. ही बातमी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना कळताच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि इतर नेत्यांनी पोलीस उपायुक्त कार्यालय गाठले. पोलीसांना ह्या संपूर्ण घडल्या प्रकाराविषयी जाब विचारला असता पोलीसांकडून, “अटक केली नसून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते” असे सांगण्यात आले. “आमच्याकडे अशी माहिती होती की काही निर्यातदारांकडे रेमडेसिवीरचा ६०,००० वायल्सचा साठा उपलब्ध आहे आणि या माहितीच्या आधारे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले गेले.” असे पोलिसांचे म्हणणे होते. पण पोलीसांकडे ताब्यात घेतलेल्या अधिकाऱ्याविषयी ठोस माहिती उपलब्ध नव्हती. अन्न आणि औषध विभागाकडून त्यांना एक पत्र मिळाले होते. पण कोणतीही ठोस माहिती मिळाली नव्हती असे पोलीसांकडून सांगण्यात आले होते.

हे ही वाचा:

आणखी कडक निर्बंध लादण्याची गरज

सहा महिन्यात भारतात बनणार लिथियम-आयन बॅटरी

नवे निर्बंध, नवे नियम

रुग्णवाढीत नोंदली गेली किंचित घट

spot_img

लेखकाकडून अधिक

2 कमेंट

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा