29 C
Mumbai
Sunday, December 28, 2025
घरराजकारणठाण्यांत राष्ट्रवादीचे बारा वाजणार

ठाण्यांत राष्ट्रवादीचे बारा वाजणार

पाच माजी नगरसेवक आज करणार शिंदे गटात प्रवेश

Google News Follow

Related

ठाण्यांत अत्यंत जेष्ठ समजले जाणारे माजी नगरसेवक हणमंत जगदाळे आणि त्यांचे चार सहकारी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. या मुळे ठाण्यातील राष्ट्रवादी ला खिंडार पडणार आहे. ठाण्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांनी आपल्या ट्विटर वर एक कविता पोस्ट केली आहे. या कवितेतूनच त्यांनी राष्ट्रवादीला खिंडार पडणार असल्याचा सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे  राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आता तणावात आले आहेत. कारण आव्हाडांना टाळून आता बरेचसे नगरसेवक बाळासाहेबांच्या पक्षात प्रवेश करत आहेत.

आव्हाड आणि त्यांच्या चमूला कंटाळूनच हि सर्व मंडळी आमच्याबरोबर येत आहेत आणि मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देत आहेत. आज बारा तारखेला आम्ही त्यांचे बारा वाजवणार असे नरेश म्हस्के यांनी म्हंटले आहे. आव्हाड सतत मुख्यमंत्री शिंदेंवर टीका करतात पर्वा पण त्यांनी खोके ओके म्हणत केक कापला. त्यावर आम्ही त्यांचे बारा तारखेला बारा वाजवून देणार आहेत आव्हाड फक्त प्रसिद्धीसाठी करतात त्यांना आपले नगरसेवक सांभाळता येत नाहीत. आधी त्यांनी आपले नगरसेवक सांभाळावे आणि नंतरच टीका करावी त्यांच्या जाचाला कंटाळून त्यांचे नगरसेवक आमच्याबरोबर येत आहेत. असेही म्हस्के म्हणाले.

जो नगरसेवक प्रामाणिक काम करतो त्याच्या कामात अडचणी आणणे हेच आव्हाड यांचे काम आहे त्यामुळे टप्प्या टप्प्याने राष्ट्रवादी रिकामी होणार असल्याचे म्हस्के यांनी सांगितले आहे. आव्हाड यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नादाला लागू नये आत्तापर्यंत तुम्ही जे काम करू शकलात ते केवळ आणि केवळ मुख्यमंत्र्यांमुळे. याचे भान असूद्यात असा इशाराही म्हस्के यांनी दिला आहे.

हे ही वाचा:

आदित्य ठाकरे पोपटपंची काय करता ?

काश्मीरमध्ये आढळला देशातील पहिला लिथियमचा साठा

सागरी जैवविविधता आणि स्वच्छता मोहिमेसाठी सामंजस्य करार

इस्रोचे सर्वात लहान रॉकेट एसएसएल- डी २ अंतराळात झेपावले

म्हस्केची कविता
एक आला दोन आले , हा ओघ निरंतर ,आव्हाडांच्या अरेरावीला , नगरसेवकांचे चोख उत्तर ,
कितीही बोला , कुणासही टोले मारा, घडाळ्यात तुमच्या आता वाजणार बारा , ठाण्यांत सुटलाय तुफान वारा , बारा तारखेला कुणाचे वाजणार बारा , राष्ट्रवादीचे नेते कुणाला ‘आव्हाईड’ करू लागलेत?

राष्ट्रवादीचे पाच नगर सेवक शिंदे गटांत जाणार
ठाण्यात आज ठाण्याचे अत्यंत जेष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे आणि त्यांचे चार सहकारी असे पाच माजी नगरसेवक बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. म्हणूनच राष्ट्रवादीला खिंडार आज पडणार आहे. मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हे पाच जण प्रवेश करणार आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा