27.1 C
Mumbai
Friday, July 11, 2025
घरराजकारणनवीन संसद भवन आणि आता सेंगोल

नवीन संसद भवन आणि आता सेंगोल

विरोधी पक्षनेत्यांचे कामांऐवजी अनावश्यक विवादांवरच लक्ष

Google News Follow

Related

दहा वर्षे विरोधात राहिल्यानंतर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पदच्युत करण्याचे तीन अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर आघाडीने आपल्या वेळेचा सदुपयोग करण्याऐवजी, नुकत्याच निवडून आलेल्या प्रशासनावर टीका करण्यासाठी फालतू मुद्दे उपस्थित करण्याच्या जुन्या डावपेचांकडे लक्ष केंद्रित केले आहे. आता, त्यांचे लक्ष आहे ‘सेंगोल’कडे. लोकसभाध्यक्षांच्या खुर्चीशेजारी असलेले सेंगोल हे भारताच्या सार्वभौमत्वाचे प्रतीक आहे. मात्र विरोधी पक्षांनी नव्याने बांधलेल्या संसदेतून ते काढून टाकण्याची मागणी केली आहे.

समाजवादी पक्षाचे खासदार आरके चौधरी यांनी २५ जून रोजी हंगामी लोकसभाध्यक्ष भर्तृहरी महताब यांना पत्र लिहून संसदेत त्यांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ते म्हणाले, “आज मी या सन्माननीय सभागृहात शपथ घेतली की, कायद्याने स्थापित केलेल्या भारतीय संविधानावर मी खरा विश्वास आणि निष्ठा ठेवीन. पण खुर्चीच्या उजव्या बाजूला ‘सेंगोल’ पाहून मला धक्काच बसला. संविधान हा एक पवित्र दस्तऐवज आहे आणि भारताच्या लोकशाहीचे प्रतीक आहे तर ‘सेंगोल’ हे राजेशाहीचे प्रतीक आहे.’

‘आपल्या मागील कार्यकाळात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने संसदेत ‘सेंगोल’ बसवले. ‘सेंगोल’ म्हणजे ‘राज-दंड.’ याचा अर्थ ‘राजा का दंड’ असाही होतो. राजेशाही संपवून देश स्वतंत्र झाला. देश ‘राजाचा दंडा’ने चालेल की संविधानाने? आपली संसद हे लोकशाहीचे मंदिर आहे, काही राजाचा वा राजवाडा नाही. माझी मागणी आहे की, ‘सेंगोल’ संसदेतून काढून टाकण्यात यावे आणि त्याजागी संविधानाची मोठी प्रतिकृती बसवावी.’

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्याचे समर्थन केले आणि दावा केला, ‘जेव्हा सेंगोल स्थापित केले गेले, तेव्हा पंतप्रधानांनी त्यास नतमस्तक केले होते, परंतु यावेळी शपथ घेताना ते नतमस्तक होणे विसरले. मला वाटते की, आमच्या खासदाराला त्याची आठवण करून द्यायची होती.’ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार बी. मणिकम टागोर यांनी हीच भावना व्यक्त केली.

‘आम्ही अगदी स्पष्टपणे सांगितले आहे की सेंगोल हे राजेशाहीचे प्रतीक आहे आणि राज्य-युग संपले आहे. आपण लोकांची लोकशाही आणि संविधान साजरे केले पाहिजे. राष्ट्रीय जनता दलाचे खासदार आणि लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारती यांनीही जाहीर केले की, ज्याने ही मागणी केली आहे, मी त्यांचे स्वागत करते. राजदचे राज्यसभेचे खासदार मनोज झा हेदेखील या सुरात सामील झाले. ‘आम्ही याला विरोध केला होता आणि संसदेत ‘सेंगोल’ हे राजेशाहीचे प्रतीक असल्याचे सांगितले होते.

आपल्या पंतप्रधानांची वर्तणूक राजासारखी आहे,’ असे ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी दागिने, कपडे, मंगळसूत्र आणि मुजरा यांसह इतर मुद्दे मांडले जे पंतप्रधानांनी त्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान विरोधकांना उघड करण्यासाठी वापरले होते. तेव्हा खासदार पुढे म्हणाले, ‘आता देशात केवळ याच विषयांवर चर्चा होईल. देश चालवणाऱ्या राज्यघटनेची एक मोठी प्रतिकृती तिथे लावणे चांगले.’

हे ही वाचा:

‘चंदू चॅम्पियन’ सिनेमा विद्यार्थी, तरुणांना विनामूल्य दाखविण्याची मागणी

देवी यल्लम्माचे दर्शन घेऊन परतणाऱ्या १३ भाविकांवर काळाचा घाला

दुर्योधन कर भरतोय!

गडचिरोलीत दोन महिला माओवाद्यांचे आत्मसमर्पण; १६ लाखांचे होते बक्षीस

काँग्रेस आणि त्यांच्या समविचारी पक्षांना ऐतिहासिकदृष्ट्या लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि संविधानाच्या नावाखाली भारताच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक प्रतीकांना अपमानित करण्यात प्रचंड आनंद झाला आहे ‘सेंगोल’ही त्याला अपवाद नाही. विशेष म्हणजे, त्यांना भारताच्या लोकशाहीशी विरोध करणारा कोणताही धर्म किंवा त्याचे चिन्ह कधीच पसंत पडत नाही.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
256,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा