27 C
Mumbai
Saturday, June 25, 2022
घरक्राईमनामाफुटीरतावादी नेता यासिन मलिकला फाशी होणार की जन्मठेप?

फुटीरतावादी नेता यासिन मलिकला फाशी होणार की जन्मठेप?

Related

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या न्यायालयात बुधवारी फुटीरतावादी नेता यासिन मलिकला शिक्षा सुनावली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांना अर्थपुरवठा केल्याचा आरोप त्याच्यावर निश्चित झाला आणि त्याला दोषी ठरविण्यात आले. १९ मे रोजी या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश प्रवीण सिंग यांनी सुनावणी २५ मे रोजी ठेवली आणि त्यात शिक्षा निश्चित करण्याचे जाहीर केले.

बुधवारी होणाऱ्या यासंदर्भातील सुनावणीआधी यासिन मलिकच्या आर्थिक स्थितीची माहिती देण्याचे आदेशही न्यायालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेला दिलेले आहेत. यासंदर्भात जेव्हा शिक्षा सुनावली जाईल तेव्हा यासिन मलिकला एकतर मृत्युदंडाची शिक्षा होईल किंवी कमीतकमी जन्मठेप होऊ शकेल. गेल्या सुनावणीवेळी यासिन मलिकने आपल्या वकिलाला सोडून दिले. त्याआधीच तो दोषी ठरला होता आणि याप्रकरणात आता आणखी काही युक्तिवाद करण्यासारखे शिल्लकही राहिले नव्हते.

यासिन मलिकवर आरोप आहेत की, त्याने कटकारस्थान रचून देशाविरुद्ध युद्ध पुकारले होते. अनेक बेकायदेशीर कृत्ये त्याने केली शिवाय, काश्मिरात त्याने शांततेला बाधा पोहोचविली. त्यासंदर्भात त्याला दोषी धरले आहे.

हे ही वाचा:

शिवसेनेचे नेते यशवंत जाधव ईडीच्या रडारवर

टेक्सासमध्ये शाळेत झालेल्या गोळीबारात १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू

पेट्रोल, PR आणि ठाकरे

आंध्रप्रदेशमधील नामांतराचा वाद विकोपाला; आमदाराचे घर पेटवले

 

गेल्या सुनावणीवेळी यासिन मलिकने हे स्पष्ट केले की, तो त्याच्यावर असलेल्या आरोपांचा बचाव करणार नाही. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत त्याच्याविरुद्ध कलम १६ (दहशतवादी कृत्य), कलम १७ (दहशतवादासाठी पैसे गोळा करणे), कलम १८ (दहशतवादी कृत्य करण्यासाठी कट रचणे), कलम २० (दहशतवादी संघटनेचा सदस्य असणे) तसेच १२० बी (गुन्हेगारी कट) आणि १२४ अ (देशद्रोह) अशी कलमे त्याच्याविरुद्ध लावण्यात आली आहेत.

त्यामुळे यासिन मलिकला कोणती शिक्षा होणार याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,938चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
10,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा