27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
घरराजकारण...नाहीतर मविआच्या मंत्र्यांनी गांधींचा फोटो काढून तिथे दाऊदचा फोटो लावावा!

…नाहीतर मविआच्या मंत्र्यांनी गांधींचा फोटो काढून तिथे दाऊदचा फोटो लावावा!

Google News Follow

Related

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी मुंबई पोलिस चौकशीसाठी आल्यानंतर त्याविरोधात भाजप आक्रमक झाली आहे. भाजपा नेते व आमदार नितेश राणे यांनी यावरून महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, मलिक यांचा राजीनामा घ्यायचा नसेल तर महाविकास आघाडीतील प्रत्येक मंत्र्याने आपल्या केबिनमध्ये महात्मा गांधींचा फोटो काढून दाऊद इब्राहिमचा फोटो लावावा.

नितेश राणे म्हणाले, फडणवीस यांनी दाऊद विरोधात जी भूमिका घेतली ती देशासाठी भूमिका घेतलेली आहे. सरकारला त्यांची ही भूमिका पटलेली नाही. दाऊदला समर्थन करणारे हे सरकार आहे. या सरकारला कळत नाही की फडणवीस हे त्यांचे बाप आहेत. या लोकांना हे कळेल की कसे अंगलट येते ते.

ही सगळी कारवाई राजकीय सुडापोटीच सुरू आहे. आम्हाला टार्गेट केले जात आहे. जो दाऊदविरोधात बोलतोय त्याला लक्ष्य केलं जातंय. दाऊद यांचा लाडका आहे. विरोधात बोलतो त्याला नोटीस पाठवतात. दाऊदला संदेश गेला पाहिजे महाविकास आघाडीचे सरकार तुझ्या बरोबर आहेत, असे सांगून राणे म्हणाले की, भाजपा कार्यकर्त्यांचे यामुळे खच्चीकरण होणार नाही. आम्ही संघर्ष करत राहू. नवाब मलिकना अटक करायला हवी अशी आमची भूमिका आहे. बाकी काय आहे. दाऊदबद्दल एवढे प्रेम आहे तर एवढे पुरावे देऊनही मलिक यांचा राजीनामा घ्यायचा नाही तर मग प्रत्येक मंत्र्याच्या केबिनमधील महात्मा गांधींचा फोटो काढून तिथे दाऊदचा फोटो लावावा, त्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा.

हे ही वाचा:

मुंबईकर नव्या आयुक्तांना म्हणतायत ‘थोडा सास तो लेने दो सर’

‘आजचे प्रश्न हे गोपनीय कायद्याचे उल्लंघन मीच केल्यासारखे होते’

काश्मीर फाईल्स चित्रपट करमुक्त करा

मध्य रेल्वेची चित्रीकरणातून २ कोटींची कमाई; हे स्थानक सर्वाधिक पसंतीचे

 

अजित पवार यांनी या नोटिशीसंदर्भात म्हटले होते की, अशी नोटीस पाठवणे ही महाराष्ट्राची परंपरा नाही. त्यावर नितेश राणे म्हणाले की अजित दादांनी मीडियासमोर हे का बोलावे. आपल्या मंत्र्यांना सांगावे. सरकारने हे वातावरण खराब केले. सरकारची हिंमत असती तर फडणवीसांना बीकेसीत बोलवायला हवे होते. विरोधी पक्षनेते मंडळींना शिंकले तरी नोटीस दिली जाते. दाऊदविरोधात बोलले की यांच्या बुडाखाली आग लागते पण जे जे दाऊदला जे मदत करतात त्यांविरोधात आम्ही बोलणारच.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा