33 C
Mumbai
Monday, May 29, 2023
घरराजकारणलोकप्रभामध्ये असताना संजय राऊत शिवसेनेबद्दल काय लिहित असत?

लोकप्रभामध्ये असताना संजय राऊत शिवसेनेबद्दल काय लिहित असत?

नितेश राणे यांनी विचारला सवाल

Google News Follow

Related

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सरड्यासारखे रंग बदलतात अशी खोचक टीका भाजपा नेते आणि आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांवर केली आहे. संजय राऊत हे सध्या बेळगावमध्ये असून त्यांनी मराठी लोकांसाठी आस्था दाखवल्यानंतर नितेश राणे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

बेळगावमध्ये संजय राऊतांनी मोठे भाषण केलं. पण, पत्राचाळमधील मराठी लोकांचं काय? त्या चाळीतील गरीब माणसांची अवस्था काय केली आहे त्यावर संजय राऊतांनी बेळगावमध्ये बोलायला हवं अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

संजय राऊत हे लोकप्रभामध्ये असताना त्यांना शिवसेनेबद्दल काही माहीत होते का? लोकप्रभामधील लेख वाचून दाखवणार आहे. संजय राऊत हे तेव्हा हिंदुत्ववादी विचारांचे नव्हते तर तेव्हा ते समाजवादी विचारांचे होते. त्यांनी हिंदू समाजाच्या विरोधात अनेक लेख लिहिले आहेत. त्या लेखांमध्ये त्यांचेच शब्द आहेत आणि लेखांवर त्यांचेच नाव आहे. संजय राऊत हे सरड्याप्रमाणे रंग बदलतात, अशी घणाघाती टीका नितेश राणेंनी केली आहे.

भाजपाचा बेळगावशी संबंध काय हे विचारण्यापूर्वी बाळासाहेबांच्या आंदोलनातील तुमची भूमिका काय होती हे सांगावं. तेव्हा तुम्ही कोणासमोर फेऱ्या मारत होतात हे स्पष्ट करावं. संजय राऊतांना बाळासाहेब ठाकरे, बेळगाव आंदोलन आणि हिंदुत्वावर बोलायचाअधिकार नाही. संजय राऊतांचे लोकप्रभामधील लेख वाचले तर बेळगावमधील लोक त्यांना चपलेने मारतील, अशी सडेतोड टीका नितेश राणेंनी केली आहे.

‘सामना’मधील आजचा अग्रलेख म्हणजे घरात भांडणं लावण्याचं काम आहे. सध्या अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये भांडणं लावण्याचं काम संजय राऊतांकडून सुरू आहे. अजित पवारांना त्यांचा रंग माहीत असल्यामुळे त्यांनी सगळ्यांसमोर संजय राऊतांना खडसावलं होत, अशी टीका नितेश राणेंनी केली आहे.

हे ही वाचा:

आता घरी बसून पार्किंगची जागा ठरवा

पोलिसांकडून बळाचा वापर; पोलिस आणि कुस्तीपटूंमध्ये झटापट

राष्ट्रवादीतील काही नेत्यांची भाजपसोबत जाण्याची इच्छा होती!

कर्नाटक निवडणुकीच्या तोंडावर मल्लिकार्जुन खर्गेंच्या मुलाला निवडणुक आयोगाची नोटीस

संजय राऊतांचे राजकारण म्हणजे सौदेबाजीवर आणि पैशावर चालतं. उद्धव ठाकरेही तसेच आहेत. उद्धव ठाकरेंनी बारसू समर्थनार्थ पत्र लिहिलं होतं. त्याची किंमत होती अंदाजे १०० कोटी होती. जसा मालक तसा कामगार, अशी खोचक टीका नितेश राणेंनी संजय राऊतांवर केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,850चाहतेआवड दर्शवा
2,018अनुयायीअनुकरण करा
75,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा