34 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरविशेषआता घरी बसून पार्किंगची जागा ठरवा

आता घरी बसून पार्किंगची जागा ठरवा

वाहनतळांचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी मुंबई महापालिका मोबाईल ऍप तयार करणार

Google News Follow

Related

मुंबईतील पार्किंगची समस्या लवकरच मार्गी लागणार असून वाहनतळांचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी मुंबई महापालिका मोबाईल ऍप तयार करणार आहे. या कामासाठी पालिकेने सल्लागाराची नियुक्ती केली आहे. त्यामुळे वाहन उभे करण्यासाठी लवकरच ऑनलाइन पद्धतीने वाहनतळावर आरक्षण करता येणार आहे.

मुंबई महानगरपालिकेने वाहनतळ प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा केली होती. तसेच वाहनतळाच्या व्यवस्थापनासाठी मोबाईल ऍप आणण्याचे ठरविण्यात आले होते. या उपक्रमाला आता गती मिळणार असल्याचे चित्र आहे. येत्या काळात महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पोर्ट ट्रस्ट, रस्त्यालगतची वाहनतळे आणि खासगी गृहनिर्माण संस्थांमध्ये पार्किंगसाठी उपलब्ध असलेल्या जागांची माहिती एकाच सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना पार्किंगसाठी जागा शोधणे सुलभ होणार आहे.

मोबाईल ऍपमुळे वाहनतळ शोधणे, जागा आरक्षित करणे सोपे होणार असून वाहनतळ संचलन, उपलब्ध वाहनतळ जागांचा पुरेपूर वापर आणि रस्त्यांवरील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे.

हे ही वाचा:

पोलिसांकडून बळाचा वापर; पोलिस आणि कुस्तीपटूंमध्ये झटापट

राष्ट्रवादीतील काही नेत्यांची भाजपसोबत जाण्याची इच्छा होती!

कर्नाटक निवडणुकीच्या तोंडावर मल्लिकार्जुन खर्गेंच्या मुलाला निवडणुक आयोगाची नोटीस

चेंबूर हादरले; संपत्तीच्या वादातून निवृत्त पोलीस उपायुक्ताच्या मुलाची हत्या

या सुविधेचा वापर करून वापरकर्त्यांना डिजिटल आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंट करता येणार आहे. यामुळे वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे.

परदेशात ज्या पद्धतीने एखाद्या ठिकाणी पोहचण्याआधीच आपल्या वाहनासाठी आरक्षण करता येते, त्याच धर्तीवर ऑनलाइन पद्धतीने कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय ही सुविधा मुंबईकरांना वापरासाठी उपलब्ध होईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासु यांनी दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा