31 C
Mumbai
Saturday, June 3, 2023
घरराजकारण"उद्धव ठाकरेंची अवस्था दरबारातल्या सरदारासारखी"

“उद्धव ठाकरेंची अवस्था दरबारातल्या सरदारासारखी”

आमदार नितेश राणे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Google News Follow

Related

ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांना आठवण करून द्यायला हवी की, जेव्हा ते युतीमध्ये होते तेव्हा त्यांना किती सन्मान मिळायचा आणि आता महाविकास आघाडीमध्ये त्यांचे अवस्था दरबारातल्या सरदारासारखी झाली आहे, असा सणसणीत टोला भाजपा नेते आणि आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासारख्या लोकांच्या तोंडी लागल्यामुळे उद्धव ठाकरेंची अशी अवस्था झाली आहे, अशी टीका नितेश राणेंनी केली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेत नेण्यासाठी उद्धव ठाकरेंकडे आज एक नेता उरलेला नाही. त्यामुळे त्यांना पगारी कामगार न्यावा लागला. शिवाय पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बसले होते. त्यांच्यासमोर संजय राऊतांनी काँग्रेसचा अपमान केला. कर्नाटकाचा विजय हा एकट्या काँग्रेसचा विजय नाही तर देशभरातील विरोधकांचा विजय आहे असं म्हणत कर्नाटकातील काँग्रेसच्या यशाचं श्रेयही काँग्रेसला दिलेलं नाही. हा अपमान नाना पटोले यांना चालतो का? असा सवाल विचारात नितेश राणे यांनी संजय राऊत हे शकुनी मामा आहेत आणि ते महाविकास आघाडीमध्ये भांडण लावायचं काम करत आहेत, अशी सडकून टीका केली.

कर्नाटकमधील यशानंतर हिंदू मंदिरांसमोर फटाके वाजवून आणि हिरवे झेंडे फडकावून आनंद साजरा केला गेला. हे असं करून कर्नाटकातील हिंदूंना संदेश द्यायचा आहे का की, हा विजय पाकिस्तानचा आहे. त्यांच्यावर दबाव टाकायचा आहे का? आणि या आनंदावर संजय राऊत अग्रलेख लिहीत आहेत. उद्धव ठाकरेंचा गौरव कुठे गेला? असा सणसणीत प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाणं म्हणजे हिंदुत्व सोडलं असं होत नाही हे ठणकावून सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सामानामधून दंगलींवर भाष्य करायला हवं होतं. पण, त्यांनी गृहमंत्र्यांवरचं प्रश्न उपस्थित केले. पण, त्यांना सांगायचं आहे की, आज कर्तबगार गृहमंत्र्यांमुळेच अकोल्यात परिस्थिती नियंत्रणात आहे, असं नितेश राणे म्हणाले. १३ ऑगस्ट २००४ रोजी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीमध्ये बैठक झाली होती या दिलेल्या माहितीवर मी ठाम आहे. महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा मनसुबा उद्धव ठाकरेंचा आहे का? याचा तपास पोलिसांनी करावा. या प्रकरणी उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करावी. यासंबंधित माहितीसाठी माझा जबाब घ्या आणि बैठकीला उपस्थित असलेल्यांचेही जबाब घ्या. पुढे उद्धव ठाकरेंची चौकशी करा, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.

हे ही वाचा:

कर्नाटकमधील काँग्रेस विजयाच्या व्यूहरचनेचा हा शिल्पकार

कर्नाटकात उपमुख्यमंत्री आणि पाच मंत्रीपदे मुस्लिमांना द्या

जयंत पाटलांना ईडीकडून दुसरं समन्स

पुन्हा जमताडा… रिल्स बनविण्याच्या छंदापायी त्याने चक्क लॅपटॉपच गायब केला!

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभ्यासाबद्दल कितीही प्रश्न उपस्थित केले तरी त्याला अर्थ नाही. दुसऱ्याचा इतिहास काढण्यापेक्षा स्वतःचा इतिहास संजय राऊतांनी पाहावा. त्यांचा घर फोडण्याचा इतिहास महाराष्ट्राला दाखवावा लागेल. राहुल नार्वेकर सर्वोच्च न्यायालयाच्या नियमावली बाहेर जाऊन निकाल देणार नाहीत असा विश्वास सगळ्यांना आहे अगदी महाविकास आघाडीमधील नेत्यांनाही आहे. मात्र, संजय राऊतांनाचं भांडण लावायची आहेत, असे आरोप नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,849चाहतेआवड दर्शवा
2,022अनुयायीअनुकरण करा
76,200सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा