27 C
Mumbai
Tuesday, August 9, 2022
घरदेश दुनियाहमिद अन्सारींनी आमंत्रित केलेल्या पाक पत्रकाराने गुप्त माहिती आयएसआयला दिली!

हमिद अन्सारींनी आमंत्रित केलेल्या पाक पत्रकाराने गुप्त माहिती आयएसआयला दिली!

Related

भारतात दिलेल्या भेटींमध्ये आपण गोळा केलेली माहिती पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर यंत्रणेला पुरविल्याचा खळबळजनक दावा पाकिस्तानचे एक ज्येष्ठ पत्रकार नुसरत मिर्झा यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर २०१०मध्ये आपल्याला भारताचे तत्कालिन उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांनी आमंत्रित केले होते. त्यावेळीही आपण मिळालेली माहिती आयएसआयकडे सुपूर्द केली होती. हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर हमिद अन्सारी आणि झफरुल इस्लाम यांच्याविरोधात तसेच काँग्रेस पक्षाच्या एकूणच कार्यपद्धतीवर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे.

मिर्झा यांनी शकील चौधरी या पाकिस्तानातील एका यूट्युबरशी झालेल्या चर्चेत ही माहिती दिली.

मिर्झा यांनी या व्हीडिओत म्हटले की, २०१०मध्ये आपण तत्कालिन उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांच्या आमंत्रणावरून भारतात आलो होतो. त्यावेळी दहशतवादावर एक परिषद आयोजित करण्यात आली होती. नंतर आपण २०११मध्ये शेवटची भेट दिली तेव्हा मिली गॅझेटचे प्रकाशक झफरुल इस्लाम खान यांना भेटलो. त्यावेळी आपल्याला भरपूर माहिती मिळाली आणि ती आपण आयएसआयला दिली.

हे ही वाचा:

एमआयएमचे शंभरहून अधिक कार्यकर्ते देणार राजीनामे

केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर बॉम्बफेक

कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’!

उद्धव ठाकरेंना धक्का; सदा सरवणकरांचा विभागप्रमुखपदाचा राजीनामा

 

मिर्झा यांना या मुलाखतीत चौधरी यांनी विचारले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात शांतता राहू शकते का, त्यावर मिर्झा यांनी भारतावरच खापर फोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तर थेट मुघलांची आठवण काढली. मुघलांनी भारतावर अनेक वर्षे राज्य केले त्याचा बदला भारत घेऊ इच्छितो आणि त्यासाठी पाकिस्तानला नष्ट करणे ही भारताची इच्छा आहे.

त्यांनी असेही सांगितले की, उत्तर प्रदेशातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्याची आपण भेट घेतली होती. त्यांनी आपल्याला सांगितले की, कसे आपण मुस्लिमांचे समर्थन केले आणि त्यांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या. हे असे होणार असेल तर उत्तम आहे. त्याचे आम्ही स्वागत करू. मुस्लिमांना गुलाम बनवून ठेवण्यात येणार असेल तर ते स्वीकारले जाणार नाही.

हमिद अन्सारी हे नेहमीच एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व राहिलेले आहेत. मिर्झा यांनी हे रहस्य उलगडल्यामुळे पुन्हा एकदा अन्सारी हे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,918चाहतेआवड दर्शवा
1,924अनुयायीअनुकरण करा
15,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा