26 C
Mumbai
Sunday, August 7, 2022
घरक्राईमनामाउद्धव ठाकरेंना धक्का; सदा सरवणकरांचा विभागप्रमुखपदाचा राजीनामा

उद्धव ठाकरेंना धक्का; सदा सरवणकरांचा विभागप्रमुखपदाचा राजीनामा

Related

उद्धव ठाकरे यांना अजून एक धक्का बसला आहे. शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेना विभागप्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. तर त्यांच्यासोबत शिवसेनेच्या तीन शाखाप्रमुखांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या दादरमध्येचं शिवसेनेला मोठं भगदाड पडल्याचं समोर आलं आहे.

सदा सरवणकर हे दादर माहिम विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. सदा सरवणकर हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. सदा सरवणकर यांनी विभागप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या तीन शाखाप्रमुख आणि तीन महिला शाखासंघटक यांनी राजीनामा दिला आहे.

आमच्या मतदार संघातील कामे गेली काही वर्षे अडकली होती पण आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्याने आमच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आता आमच्या मतदारसंघातील कामे मार्गी लागतील अशी आशा राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा:

सोनिया गांधी यांना ईडीचे समन्स; २१ जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

सोबतच्या पंधरा आमदारांना उद्धव ठाकरेंचं भावनिक पत्र

१६ आमदारांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

झारखंडच्या ‘ज्या’ शाळांनी नियम बदलले, त्यांच्यावर होणार कारवाई

दरम्यान, शिवसेनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते दिवसेंदिवस सेना सोडून शिंदे गटात सामील होत आहेत. आमदारांबरोबर खासदारंचीही नाराजी हळूहळू बाहेर येऊ लागली आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करण्याची मागणी केली आहे त्यामुळे त्यांच्या कल स्पष्टपणे दिसत आहे. त्याचबरोबर माजी खासदारांनीही शिंदे गटाची वाट धरली आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी चिंतेची बाब आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,919चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
14,900सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा