24.5 C
Mumbai
Wednesday, January 21, 2026
घरराजकारणपंढरपूर-मंगळवेढ्याचा निकाल राज्याच्या राजकारणाची दिशा बदलणार

पंढरपूर-मंगळवेढ्याचा निकाल राज्याच्या राजकारणाची दिशा बदलणार

Google News Follow

Related

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल हा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा असल्याचे भाकीत भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले. पंढरपूरच्या पोटनिवडणुकी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र असूनही भाजपाने अचूक व्यवस्थ आणि देवेंद्र फडणवीसांचा चेहरा या बळावर ही निवडणूक जिंकली होती. त्यामुळे महाविकासआघाडीला मोठा धक्का बसला होता.

या निवडणुकीत भाजपाच्या समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगीरथ भालके यांच्यावर ३७०० मतांनी मात केली होती. गेल्या काही महिन्यांत राज्यभरात झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपाला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागत होता. मात्र, पंढरपूरची पोटनिवडणूक याला अपवाद ठरली. बड्या नेत्यांच्या प्रचारसभांमुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणुकीत अखेर भाजपाने बाजी मारली होती.

भाजपाने महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांना धोबीपछाड देत पंढपूरची निवडणूक जिंकली. त्यामुळे आता भाजपा राज्यात पुन्हा ‘ऑपरेशन लोटस’ राबवणार असल्याची कुजबूज सुरु झाली होती. ‘तुम्ही पंढरपूरमध्ये भाजपाला साथ द्या…मी राज्यात यांचा करेक्ट कार्यक्रम करतो’, अशा आशयाचे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरातील प्रचारसभेत केले होते.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीचा पराभव हा लोकांच्या नाराजीमुळे झालेला नाही. तर याठिकाणी रणनीती आखण्यात महाविकासआघाडी कमी पडली. भगीरथ भालके यांच्याऐवजी त्यांच्या आईला उमेदवारी दिली असती तर काम सोपं झालं असतं. मात्र, आम्ही हा निकाल स्वीकारला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी म्हटले होते.

हे ही वाचा:

लसीकरणावरून भारताला शिकवणीची गरज नाही- फ्रेंच राष्ट्राध्यक्ष

‘या’ कंपनीत मिळणार २८ हजार तरुणांना नोकऱ्या

चीनचे रॉकेट मालदीवजवळ कोसळले

स्वतःच्या मुलाला मंत्री केलंत, तसंच आता बहुजनांच्या मुलांच्या नियुक्त्या करा

मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ज्याप्रमाणे आदित्य ठाकरे यांची तातडीने मंत्रिपदी नियुक्ती केली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील बहुजन युवकांचे पालकत्व स्वीकारुन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा