29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरक्राईमनामापरमबीर गेले बेल्जियमला?

परमबीर गेले बेल्जियमला?

Google News Follow

Related

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग हे सध्या फरार असून ते सध्द्या कुठे आहेत याचा कोणताच थांगपत्ता लागत नाहीये. अशातच काँग्रेस नेते आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांनी परमबीर सिंग हे बेल्जियममध्ये असल्याचा दावा केला आहे. निरूपम यांच्या या दाव्यामुळे परमबीर सिंग प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठाकरे सरकारवर लेटर बॉम्ब टाकत शंभर कोटी वसुली प्रकरणाचा गौप्यस्फोट करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे सध्या गायब आहेत. परमबीर सिंग सध्या कुठे आहेत याचा छडा अजून पोलिसांनाही लागलेला नाही. परमबीर सिंग यांना चौकशीसाठी अनेकदा समन्स बजावूनही ते चौकशीसाठी हजर राहत नाहीत. तर ठाणे न्यायालय आणि मुंबईतील अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांनी त्यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. परमबीर सध्या आहेत तरी कुठे? हा प्रश्न सर्वांना सतावत असताना परमबीर परदेशात पळून गेले असल्याची चर्चा रंगताना दिसली होती.

हे ही वाचा:

गाणाऱ्या व्हायोलिनचे सूर हरपले; प्रभाकर जोग कालवश

‘कुणाचा नवरा हिंदू की मु्स्लिम याचे नवाब मलिक आणि मीडियाला काय देणेघेणे?’

‘युवराजांचे बाबा झाले ‘एसटी’ कामगरांचे यमराज’

जो जितेगा वही सिकंदर

अशातच आता मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी परमबीर सिंग हे बेल्जियममध्ये असल्याचा दावा केला आहे. या संबंधी संजय निरुपम यांनी ट्विट केले आहे. परमबीर पाच प्रकरणांमध्ये वॉन्टेड असून ते फरार असल्याचे पोलिस सांगतात. परमबीर सिंह बेल्जियममध्ये असल्याची माहिती मिळत आहे. ते बेल्जियमला कसे गेले? त्यांना सेफ पॅसेज कोणी दिला? आपण अंडरकव्हर पोलिस अधिकारी पाठवून त्यांना परत आणू शकत नाही का? असे सवाल संजय निरुपम यांनी विचारले आहेत.

निरुपम यांच्या ट्विटमुळे परमबीर प्रकरणात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. त्यामुळे शंभर कोटी खंडणी प्रकरण आणि इतर काही प्रकरणांमध्ये पोलिस ज्यांचा शोध घेत आहेत असे परमबीर सिंग नेमके आहेत तरी कुठे? हा प्रश्न सातत्याने ऐरणीवर येताना दिसत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा