22 C
Mumbai
Monday, December 9, 2024
घरराजकारणशक्तीचा अपमान करतात काँग्रेसचे 'युवराज'!

शक्तीचा अपमान करतात काँग्रेसचे ‘युवराज’!

पंतप्रधान मोदींचा तामिळनाडूतील विरोधकांना टोला

Google News Follow

Related

लोकसभेच्या प्रचाराकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडू दौऱ्यावर आहेत.यावेळी पंतप्रधानांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (१० एप्रिल) तामिळनाडूतील सत्ताधारी काँग्रेस आणि त्यांचा मित्रपक्ष द्रमुक यांनी केलेल्या ‘शक्ती’ टिप्पण्यांवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेसचा खरपूस समाचार घेत पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसचे युवराज शक्तीचा अपमान करतात आणि शक्तीला नष्ट करण्याची भाषा करतात.

पंतप्रधान मोदींनी वेल्लोरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित केले.त्यावेळी ते बोलत होते.पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मला नेहमीच वेल्लोरबद्दल आदर वाटतो. तामिळनाडू ही शक्तीची पूजा करणाऱ्यांची भूमी आहे. इंडिया आघाडीचे लोक शक्तीचा अपमान करतात, काँग्रेसचे युवराज शक्ती नष्ट करण्याबाबत बोलले. हे लोक राम मंदिरावर बहिष्कार घालतात. ते म्हणाले की, द्रमुक आणि इंडिया युतीचे सदस्य महिलांचा अपमान करतात… तुम्ही आम्हाला दिलेला आशीर्वाद सनातनचे संरक्षण करेल आणि महिलांचा सन्मान वाढवेल.

हे ही वाचा:

छत्तीसगढमध्ये बस दरीत कोसळली, १२ मजुरांचा मृत्यू!

राम मंदिरात दिसणार अनोखे सोन्याचे रामायण!

बागेश्वर बाबा यांना जीवे मारण्याची धमकी

भारताने डोळे वटारल्यावर कॅनडाचे ट्रुडो वरमले

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, ‘द्रमुकने तामिळनाडू आणि देशाच्या भावी मुलांनाही सोडले नाही. शाळकरी मुलेही ड्रग्जच्या आहारी गेली आहेत.द्रमुक पक्षाचे राजकारण हे फूट पाडा आणि राज्य करा यावर आधारित आहे. हे लोकांना आपापसात भांडायला लावतात.मी ठरवले आहे की, द्रमुकच्या या घातक राजकारणाचा पर्दाफाश करणारच.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
210,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा