28 C
Mumbai
Sunday, August 23, 2026
घरराजकारण'वंदे मातरम'बाबत काँग्रेसच्या निर्णयाचा भाजपाकडून निषेध ठराव

‘वंदे मातरम’बाबत काँग्रेसच्या निर्णयाचा भाजपाकडून निषेध ठराव

पंतप्रधान मोदींनी घेतली नव्या कार्यकारिणीची भेट

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पक्षाच्या नवनियुक्त राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या बैठकीत काँग्रेसच्या वंदे मातरमबाबतच्या निर्णयाविरोधात भाजपाने निषेध ठराव मांडला. वंदे मातरम या गीताची केवळ दोनच कडवी आम्ही गाऊ असा काँग्रेसने ठराव मांडला आहे. त्याविरोधात भाजपाच्या या बैठीकत निषेध करण्यात आला आणि तुष्टीकरणासाठी राष्ट्रगीताशी कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही, असे या ठरावात म्हटले आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी १७ ऑगस्ट रोजी ६५ सदस्यीय नव्या टीमची घोषणा केल्यानंतर या पदाधिकाऱ्यांसोबतची ही मोदींची पहिलीच बैठक होती. बैठकीनंतर पंतप्रधान मोदी यांनी समाजमाध्यमावर प्रतिक्रिया देताना संघटनात्मक बैठका म्हणजे पक्ष मजबूत करण्यासाठी आणि जनतेशी संपर्क अधिक दृढ करण्यासाठी नव्या कल्पना व दृष्टिकोनांवर चर्चा करण्याचे व्यासपीठ असल्याचे म्हटले. मोदी यांनी नव्या संघटनात्मक टीमसोबत चांगली चर्चा झाल्याचेही नमूद केले.

‘वंदे मातरम्’वर भाजपचा ठराव

दरम्यान, भाजपने ‘वंदे मातरम्’च्या मुद्द्यावरही ठराव मंजूर केला. काँग्रेस कार्यकारिणीने पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’ची केवळ पहिली दोन कडवी म्हणण्याच्या निर्णयाचा भाजपने निषेध केला. राजकीय सोय किंवा तुष्टीकरणासाठी राष्ट्रीय गीताचा सन्मान आणि वारसा याबाबत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही, असे भाजपच्या ठरावात म्हटले आहे.

भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांनी १९३७ मधील राजकीय तडजोडीला १९५० मधील घटनात्मक व्यवस्थेपेक्षा आणि २०२६ मध्ये संसदेत मंजूर करण्यात आलेल्या कायद्यापेक्षा अधिक महत्त्व देता येणार नसल्याचे म्हटले. संसदेने ३० जुलै रोजी राष्ट्रीय सन्मानाचा अवमान प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करणारे विधेयक मंजूर केले होते. या सुधारणेनुसार ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीत ‘जन गण मन’च्या बरोबरीचा कायदेशीर दर्जा देण्यात आल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

भाजपच्या नव्या संघटनात्मक फेरबदलात माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य राम माधव यांना पुन्हा महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारी देण्यात आली आहे. याआधी शनिवारी भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांनी राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत पक्षाची संघटनात्मक रणनीती, आगामी विधानसभा निवडणुका, तळागाळातील जनसंपर्क आणि केंद्र सरकारच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याबाबत चर्चा झाली.

हे ही वाचा:

जेन झी साठी भाजपाची मोठी नवी रणनीती

साखरेच्या दरात भडका; महिनाभरात २१ टक्क्यांची वाढ

अमेरिका-कॅनडा व्यापारयुद्धाला नवे वळण

हुथींसमोर भारतीय नौदलाची ‘ढाल’; जहाजाकडून बाब-अल-मंदेब पार

‘युवा संवाद’ला भाजपचे प्राधान्य

नव्या पदाधिकाऱ्यांना ‘युवा संवाद’ या उपक्रमाला प्राधान्य देण्याच्या सूचना नितीन नबीन यांनी दिल्या आहेत. भाजप आगामी काळात युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संपर्क अभियान राबवण्याच्या तयारीत आहे. विशेषतः १४ वर्षे आणि त्यावरील वयोगटातील तरुणांशी संवाद वाढवण्यावर पक्षाचा भर असणार आहे.

या वयोगटात ‘जनरेशन झेड’ आणि ‘जनरेशन अल्फा’चा मोठा समावेश असल्याने त्यांच्याशी प्रभावी संवाद साधण्यासाठी विशेष पथके तयार करण्याची तयारी सुरू आहे. देशभरातील वरिष्ठ नेत्यांचा समावेश असलेली स्वतंत्र पथके तयार करण्याची योजना भाजपने आखली आहे. भारतीय जनता युवा मोर्चालाही या पथकांची निर्मिती आणि संघटनात्मक कामात महत्त्वाची भूमिका देण्यात आली आहे. पक्षाचे माजी राष्ट्रीय पदाधिकारीही या युवा संपर्क अभियानात सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आगामी निवडणुकांची तयारी

बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीवरही सविस्तर चर्चा झाली. तळागाळातील संघटना अधिक मजबूत करण्याबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. नितीन नबीन रविवारी सकाळी १० वाजता भाजप मुख्यालयाच्या विस्तार कार्यालयात आणखी एक संघटनात्मक आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीला देशभरातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष, संघटन महामंत्री आणि राज्य प्रभारी उपस्थित राहणार आहेत.

उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबसह आगामी विधानसभा निवडणुका होणाऱ्या राज्यांतील तयारीचा या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. त्याचबरोबर पक्षाचे विविध कार्यक्रम आणि संघटनात्मक विषयांवरही चर्चा होणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
328,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा