28 C
Mumbai
Sunday, August 23, 2026
घरराजकारणसंसदेत नारीशक्ती विधेयक निकंदन; पुण्यात वंदन

संसदेत नारीशक्ती विधेयक निकंदन; पुण्यात वंदन

राहुल गांधींचे छात्रो की गुंज कार्यक्रमात दुटप्पी धोरण

Google News Follow

Related

संसदेत काँग्रेस पक्षाने घातलेल्या अभूतपूर्व गोंधळामुळे पावसाळी अधिवेशन वाहून गेले. नारी शक्ती वंदन विधेयकासोबत अनेक महत्त्वाच्या विधायकांचा कडेलोट झाला. संसदेत महिला सबलीकरणाच्या विधेयकाला चूड लावणाऱ्या राहुल गांधी यांनी आपणच कसे महिलांचे तारणहार अशी शो बाजी पुण्यात केली.

पुण्यामध्ये ‘छात्रो की गुंज’ या कार्यक्रमात महिलांना कसे पुरुषी वर्चस्वापुढे दबून राहावे लागते या मुद्द्याला मनुस्मृती, आरएसएसचा द्वेष याच्याशी जोडून राहुल गांधींनी शिळ्या कढीला ऊत आणला.

नुकतेच जे पावसाळी अधिवेशन पार पडले त्यात राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली विरोधकांकडून प्रचंड गोंधळ घालण्यात आला. त्यामुळे एकही दिवस संसदेचे कामकाज होऊ शकले नाही. त्यात नारी शक्ती वंदन हे महिला आरक्षण विधेयक येईल ही अपेक्षा होती, पण राहुल गांधी यांच्या धसमुसळ्या  राजकारणामुळे ते विधेयक बारगळले. पण पुण्यात मात्र राहुल गांधी हे महिलांचे मसीहा बनत असल्याचे चित्र दिसले.

हे ही वाचा:

हे कसले आंदोलन…राहुल गांधी तर चॉकलेट, गोळ्या फेकत होते!

‘वंदे मातरम’बाबत काँग्रेसच्या निर्णयाचा भाजपाकडून निषेध ठराव

त्र्यंबकेश्वरमध्ये रुग्णालय स्थलांतराला विरोध

जेन झी साठी भाजपाची मोठी नवी रणनीती

“मनुस्मृतीने महिलांना 3 चौकटीत बसवलं. महिलांना स्वातंत्र्य नाही असा मनुस्मृतीचा विचार ” हा नेहमीचा घासून गुळगुळीत झालेला मुद्दा राहुल गांधी यांनी मांडला.

आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी वेगवेगळ्या भागातील, क्षेत्रातील मुलींना बोलावून त्या पुरुषांच्या वर्चस्वाच्या कशा पीडित आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला.  महिला या देशाची सर्वात मोठी ताकद आहे, असं म्हणत राहुल गांधी यांनी आजच्या कार्यक्रमात महिला सक्षमीकरणाचा मुद्दा घेतला, पण संसदेत मात्र महिलांच्या सक्षमीकरणाचा विचार करणाऱ्या विधेयकाला विरोध केल्याचे वास्तव मात्र लपले नाही.  पिंजरा तोडा असे आवाहन करत महिलांना समाज कसा तुमच्याविरुद्ध आहे हे सांगण्याचा आटापिटा राहुल गांधींनी केला.

महिलांना केवळ मुलगी, पत्नी किंवा आई या तीन चौकटीत पाहणे चुकीचे आहे. या भूमिका महत्त्वाच्या असल्या तरी, ती त्यांची एकमेव ओळख असू नये, असं लेक्चरही राहुल गांधींनी मुलींना दिलं. कार्यक्रमात समोर शिकलेल्या, नोकरीपेशा, चांगल्या घरातल्या, आईवडिलांनी पूर्ण स्वातंत्र्य दिलेल्या महिला, मुली असताना आपल्या स्त्रिया स्वतंत्र असायला हव्यात. तुम्ही कोणावरही अवलंबून नाही, असा संदेश राहुल गांधींनी दिला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
328,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा