24 C
Mumbai
Saturday, January 10, 2026
घरराजकारणमन की बात: ‘ऑपरेशन सिंदूर’पासून खेळ आणि विज्ञानापर्यंत सर्व क्षेत्रात भारताचा ठसा

मन की बात: ‘ऑपरेशन सिंदूर’पासून खेळ आणि विज्ञानापर्यंत सर्व क्षेत्रात भारताचा ठसा

नरेंद्र मोदींनी २०२५मधील भारताला मिळालेल्या यशाचा घेतला आढावा

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमात सरते वर्ष अर्थात २०२५ मधील अनेक घटना, चर्चा आणि मिळालेल्या यशाचा उल्लेख केला. मन की बात ऐकणाऱ्या संपूर्ण देशाने त्याचे कौतुक केले. देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांच्या मनात संपूर्ण वर्षाच्या आठवणी फेर धरत आहेत. २०२५ ने असे अनेक क्षण दिले, ज्यांचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाच्या सुरक्षेपासून खेळाच्या मैदानापर्यंत, विज्ञानाच्या प्रयोगशाळांपासून ते जगातील मोठ्या व्यासपीठांपर्यंत भारताने सर्वत्र आपली ठसठशीत छाप उमटवली आहे.

‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले, “या वर्षी ‘ऑपरेशन सिंदूर’ प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचे प्रतीक ठरले. आजचा भारत आपल्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करत नाही, हे जगाने स्पष्टपणे पाहिले. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान देशाच्या कानाकोपऱ्यातून मातृभूमीप्रती प्रेम आणि समर्पणाचे दृश्य पाहायला मिळाले. लोकांनी आपापल्या पद्धतीने आपल्या भावना व्यक्त केल्या.”

हे ही वाचा:

पचनाशी संबंधित आजारांवर नाशपात्याचा उपाय

नकली रेबीज लसीबाबत इशारा

लोको पायलटने ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये जिंकले २५ लाख

भारत दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग हब बनला

ते पुढे म्हणाले की, हाच उत्साह तेव्हा देखील पाहायला मिळाला, जेव्हा ‘वंदे मातरम्’ला १५० वर्षे पूर्ण झाली.
“मी ‘हॅशटॅग वंदे मातरम् १५०’सह आपले संदेश आणि सूचना पाठवण्याचे आवाहन केले होते. देशवासीयांनी या मोहिमेत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, २०२५ हे वर्ष खेळांच्या दृष्टीनेही अविस्मरणीय ठरले. पुरुष क्रिकेट संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, तर महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच विश्वचषक आपल्या नावावर केला. भारताच्या मुलींनी ‘ब्लाइंड टी-२० वर्ल्ड कप’ जिंकून इतिहास घडवला. आशिया कपमध्येही तिरंगा अभिमानाने फडकला. पॅरा खेळाडूंनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अनेक पदके जिंकून हे सिद्ध केले की कोणतीही अडचण त्यांच्या जिद्दीला रोखू शकत नाही.

विज्ञान आणि अंतराळ क्षेत्रातही भारताने मोठी झेप घेतल्याचे त्यांनी आठवण करून दिले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापर्यंत पोहोचणारे पहिले भारतीय ठरले. आपल्या संबोधनात पंतप्रधान मोदी म्हणाले की, पर्यावरण संरक्षण आणि वन्यजीव संवर्धनाशी संबंधित अनेक उपक्रमही २०२५ ची ओळख ठरले. भारतात चित्यांची संख्या ३०पेक्षा जास्त झाली आहे.

श्रद्धा, संस्कृती आणि भारताच्या वारशाबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, वर्षाच्या सुरुवातीला प्रयागराज येथील महाकुंभाने संपूर्ण जगाला अचंबित केले. वर्षाच्या अखेरीस अयोध्येतील राम मंदिरावर ध्वजारोहणाचा कार्यक्रम प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमान भरून गेला. स्वदेशी वस्तूंविषयीही लोकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. ज्या वस्तूंमध्ये भारतीयांच्या श्रमांचा सुगंध आणि भारताच्या मातीचा दरवळ आहे, अशाच वस्तू खरेदी केल्या जात आहेत.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, अभिमानाने सांगता येईल की 2025 ने भारताला अधिक आत्मविश्वास दिला आहे. तसेच 2026 मध्ये नवीन आशा आणि नव्या संकल्पांसह देश पुढे जाण्यास सज्ज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा