30 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
घरराजकारण'तुमच्या पदकांनी युवकांना प्रेरणा मिळेल'

‘तुमच्या पदकांनी युवकांना प्रेरणा मिळेल’

पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रकुल खेळाडूंशी साधला संवाद

Google News Follow

Related

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव समारंभाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत यश मिळवलेल्या खेळाडूंशी संवाद साधला आहे. पंतप्रधान मोदींनी यावेळी जिंकलेल्या व सहभागी झालेल्या खेळाडूंचे स्वागत आणि अभिनंदन केले आहे. भारतीय खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धेत ६१ पदकं पटकावली आहेत.

तुम्ही देशाला केवळ पदकच देत नाही, तर आनंद साजरा करण्याची आणि अभिमान बाळगण्याची संधी देत ​​आहे. तर तुमची ही पदके ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही भावनाही मजबूत करत आहे. भारतीय खेळाडू हे कोणत्याही खेळासाठी तत्पर असतात. तुम्ही देशातील तरुणांना केवळ क्रीडा क्षेत्रातच नव्हे तर इतर क्षेत्रातही चांगले काम करण्यासाठी प्रेरित करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

पराभूत झालेल्या खेळाडूंना पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच प्रेरणा देत असतात. राष्ट्रकुल स्पर्धेत पदकं हुकलेल्या खेळाडूंना पंतप्रधान मोदी म्हणाले, भारतीय खेळाडू हे कोणत्याही खेळासाठी तत्पर असतात, दरम्यान ज्या खेळाडूंचे थोडक्यात पदक हुकले त्यांनी भारताची माफी मागण्याची गरज नाही आहे. तुम्ही देशासाठी विजेते आहात. फक्त तुम्ही आपला खेळ इमानदारीने खेळा. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय मुलींने रौप्यपदक जिंकले असून,तुमचे हे यश भारतातील प्रत्येक मुलीसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास यावेळी पंतप्रधान मोदींना व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:

नुपूर शर्मांची हत्या करण्यासाठी आलेल्या दोन दहशतवाद्यांच्या आवळल्या मुसक्या

धक्कादायक! जळगावमध्ये भावाकडून बहिणीसह प्रियकराची हत्या

समीर वानखेडेंना जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडून क्लीनचीट

उमेश कोल्हे हत्या प्रकरणी NIA कडून दहाव्या आरोपीला अटक

भारताला तुम्ही फक्त पदके दिलेली नाहीत तर भारतीयांच्या मनातल्या भावना मजबूत केली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात हातभार लावला आहे. त्यांची जशी प्रेरणा आपणाला मिळते तशीच प्रेरणा भारतीय युवकांना तुमच्या विजयाने मिळणार आहे. तुमचा खेळ देशासाठी प्रेरणादायी आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा