26 C
Mumbai
Sunday, August 7, 2022
घरराजकारणपंतप्रधान मोदी ७ जुलैला वाराणसी दौऱ्यावर

पंतप्रधान मोदी ७ जुलैला वाराणसी दौऱ्यावर

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ जुलै रोजी वाराणसीला भेट देणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी वारासणीला कोट्यवधी रुपयांची प्रकल्प भेट देणार असून अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. या दरम्यान पंतप्रधान मोदींच्या हस्ते वाराणसीला १ हजार २०० कोटी रुपयांचे १३ नवीन प्रकल्प मिळणार आहेत. तसेच पंतप्रधान मोदी आपल्या दौऱ्यात ६०० कोटी रुपयांच्या 33 तयार प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. अशा प्रकारे एकूण १ हजार ८०० कोटी रुपयांच्या ४६ प्रकल्पांना वाराणसीला मंजुरी देण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ जुलै रोजी लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून वाराणसीतील पोलीस लाईनमध्ये येणार आहेत. तेथून रोडने ते ऑर्डरली बाजार येथील एलटी कॉलेज कॅम्पसमध्ये अक्षय पत्र किचनचे उद्घाटन करणार आहेत. यानंतर ते सिग्रा येथील रुद्राक्ष इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये जाणार आहेत. सिग्रा येथील डॉ. संपूर्णानंद स्पोर्ट्स स्टेडियममध्ये, पंतप्रधान मोदी १ हजार ८०० कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. या कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचाही सहभाग असणार आहे. या कार्यक्रमासाठी एसपीजीच्या आयजीच्या नेतृत्वाखाली ७० अधिकारी आणि जवानांचे पथक शहरात तैनात असणार आहे.

हे ही वाचा:

अमरावती हत्या प्रकरणातील सूत्रधार इरफान खान जेरबंद

शिवसेनेचा बॉस कोण? शिंदे की ठाकरे?

बंडानंतर शिवसैनिकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

‘रेडिसन ब्लू’ हॉटेलचं बिल शिंदे आणि समर्थक आमदारांनी केलं चुकतं  

या दरम्यान, पंतप्रधान देशभरातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा देखील करू शकतात. पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यासाठी खेळाडूंची यादी तयार केली जात आहे. साडेचार तासांच्या मुक्कामानंतर पंतप्रधान तेथून हैदराबादला रवाना होतील.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,919चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
14,900सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा