27 C
Mumbai
Tuesday, August 9, 2022
घरराजकारण‘रेडिसन ब्लू’ हॉटेलचं बिल शिंदे आणि समर्थक आमदारांनी केलं चुकतं  

‘रेडिसन ब्लू’ हॉटेलचं बिल शिंदे आणि समर्थक आमदारांनी केलं चुकतं  

Related

विधानपरिषद निवडणूक निकालानंतर नाराज झालेले शिवसेनेचे बंडखोर आमदार सुरतमध्ये गेले आणि तिथून हे आमदार गुवाहाटी येथे मुक्कामाला गेले. त्यानंतर हे आमदार ‘रेडिसन ब्लू’ या हॉटेलमध्ये वास्तव्याला होते. त्यानंतर हे आमदार सध्या गोवा येथे आहेत मात्र, ‘रेडिसन ब्लू’ हॉटलचे संपूर्ण बिल एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांनी दिल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेना बंडखोर आमदार एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदार गुवाहाटी येथील ‘रॅडिसन ब्लू’ हॉटेलमध्ये आठ दिवस मुक्कामाला होते. बुधवारी या आमदारांनी चेक आऊट करताच या सर्वांनी हॉटेलचे बिलं दिल्याची माहिती एका हॉटेल कर्मचाऱ्याने सांगितली. ही रक्कम ६८ ते ७० लाख रुपये असल्याची माहिती ‘सकाळ’ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

हे ही वाचा:

धर्मवीर सुपरहिट झाला! किती कमावले?

दहा तासांनी राऊत यांची ईडी कार्यालयातून सुटका

उद्धवजी कृपा करा, मुंबईकरांच्या मेट्रो स्वप्नाशी खेळू नका….

भाजपाकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकरांना उमेदवारी

बंडखोर आमदारांच्या वास्तव्यासाठी गुवाहाटी येथील रेडिसन ब्लू हॉटेलची निवड करण्यात आली होती. हॉटेल बुकिंगवेळी हॉटेलच्या सर्व ७० खोल्या बुक करण्यात आल्या होत्या. तसेच हॉटेलचे रेस्टॉरंट आणि इतर सुविधा बाहेरील लोकांसाठी २२ ते २९ जून या कालावधीत संपूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर या सर्व आमदारांनी हॉटेल आणि जेवणाचं बील भरल्याची माहिती हॉटेल कर्मचाऱ्याने दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,918चाहतेआवड दर्शवा
1,924अनुयायीअनुकरण करा
15,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा