27 C
Mumbai
Tuesday, August 9, 2022
घरक्राईमनामादहा तासांनी राऊत यांची ईडी कार्यालयातून सुटका

दहा तासांनी राऊत यांची ईडी कार्यालयातून सुटका

Related

मुंबईतील गोरेगाव पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यानी शिवसेना नेते संजय राऊत यांची सलग दहा तास चौकशी केली. ईडीने त्यांचा जबाब नोंदवून घेत रात्री दहा वाजता राऊत यांना सोडण्यात आले.

मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणात ईडीने मनी लॉन्डरिंगचा गुन्हा दाखल करत बांधकाम व्यवसायिक प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आली होती. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात चौकशीत शिवसेना नेते संजय राऊत यांचा नाव पुढे आल्यामुळे ईडीने राऊत यांना २८ जून रोजी समन्स बजावले होते. मात्र त्यावेळी राऊत यांनी ईडीकडे वकिलामार्फत १४ दिवसांची वेळ मागितली होती.

ईडीने १४ दिवसांची विनंती फेटाळून लावत १ जुलै रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी राऊत यांना दुसरे समन्स बजावले होते. शुक्रवारी सकाळी संजय राऊत हे साडेअकरा वाजता ईडीच्या कार्यालयात चौकशीकामी हजर झाले होते. ईडीवर माझा पूर्ण विश्वास असून मी त्याच्या चौकशीला सहकार्य करण्यासाठी आलो असल्याचे सांगत राऊत हे ईडीच्या कार्यालयात हजर झाले. तब्बल दहा तासांच्या चौकशीनंतर त्यांचा जबाब नोंदवून त्यांनी सोबत आणलेली कागदपत्रे ईडीच्या अधिकाऱ्याकडून तपासण्यात आली. रात्री उशिरा दहा वाजता राऊत यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांना सोडण्यात आले.

हे ही वाचा:

उद्धवजी कृपा करा, मुंबईकरांच्या मेट्रो स्वप्नाशी खेळू नका….

भाजपाकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकरांना उमेदवारी

आणि पुन्हा नीरज चोप्राने स्वतःचाच विक्रम मोडला

नुपूर शर्माप्रकरणी केलेल्या वक्तव्यांमुळे न्यायाधीशांबद्दल सोशल मीडियात संताप

 

काय आहे प्रकरण

मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचं काम देण्यात आलं होतं. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,918चाहतेआवड दर्शवा
1,924अनुयायीअनुकरण करा
15,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा