28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरराजकारणभाजप ३०० जागा पार करेल, पंतप्रधान मोदींविरोधात नाराजी नाही!

भाजप ३०० जागा पार करेल, पंतप्रधान मोदींविरोधात नाराजी नाही!

राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांचे वक्तव्य

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे सात पैकी पाच टप्पे पूर्ण झाले आहेत.४ जूनला निकाल जाहीर होणार आहे.लोकसभा निवडणुकीत भाजप ४०० चा आकडा पार करेल, असा दावा पक्षांकडून करण्यात येत आहे.तत्पूर्वी राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांनी भाजपबाबत मोठं भाकीत केले आहे.लोकसभा निवडणुकीत भाजपला जवळपास ३०० जागा मिळण्याची शक्यता असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कोणताही राग नसल्याचे प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.इंडिया टुडेल्या दिलेल्या मुलाखतीत राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर बोलत होते.

प्रशांत किशोर म्हणाले की, भाजपला स्वबळावर ३७० जागा मिळणे अशक्य आहे.पक्षाला जवळपास ३०० जागा मिळतील.ते पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदींनी ज्या दिवसापासून दावा केला की, भाजप ३७० जागा मिळवेल आणि एनडीए ४०० चा टप्पा ओलांडेल त्या दिवसापासून मी हे शक्य नसल्याचे म्हणालो.कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी ही सगळी घोषणाबाजी आहे. ते पुढे म्हणाले की, भाजपला ३७० जागा मिळणे अशक्य आहे.परंतु हे देखील निश्चित आहे की पक्ष २७० च्या खाली जाणार नाही, याचा मला विश्वास आहे.भाजपने मागील लोकसभा निवडणुकीत ३०३ जागा मिळवल्या होत्या, किंवा कदाचित त्याहून अधिक जागा पक्षाला मिळतील, ते पुढे म्हणाले.

हे ही वाचा:

धोनी मुख्य प्रशिक्षकासाठी स्टीफन फ्लेमिंगचे मन वळविणार?

आधी ‘लेडी सिंघम’ होते, आता भाजपाची एजंट? स्वाती मालीवाल यांचा सवाल

सिसोदियांच्या न्यायालयीन कोठडीत ३१ मे पर्यंत वाढ

इंडी आघाडी देशाचे विभाजन करणारी, ते देशाला पुढे काय नेणार?

लोकसभा निवडणुकीत भाजपला ३०० जागा मिळतील असे का वाटते?, असा प्रश्न विचारला असता यावर स्पष्टीकरण देताना प्रशांत किशोर म्हणाले, भाजप पक्षाला उत्तर आणि पश्चिम भागात कोणतीही अडचण येणार नाही.मात्र, दक्षिण आणि पूर्व (बिहार, बंगाल, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ) भागात फरक पडू शकतो.

तसेच पंतप्रधान मोदींविरोधात नाराजी नसल्याचे त्यांनी सांगितले.सरकार कसे पडते यावर बोलताना प्रशांत किशोर म्हणाले, जेव्हा एखादी नवीन व्यक्ती येते आणि लोकांमध्ये त्याच्याबद्दल सकारात्मक प्रतिमा निर्माण होते तेव्हा असे घडते. जेव्हा लोकांच्या मनात नवीन व्यक्तीबद्दल अशी धारणा तयार होते की, तो येईल आणि आपली परिस्थिती मोदीजींपेक्षा चांगली करेल, तेव्हा बदल होण्यास सुरुवात होते.मात्र, सध्या अशी परिस्थिती नाहीये की जनतेला बदल हवा आहे आणि अशा कोणी व्यक्तीही नाही जो त्यांच्यापेक्षा चांगले काम करेल, असे प्रशांत किशोर म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा