केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारला.
यानंतर पंतप्रधानांच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींनी केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे त्यांच्या विद्यमान खात्यांसोबतच शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्याचे निर्देश दिले. प्रल्हाद जोशी हे कर्नाटकातील धारवाड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. सध्या ते केंद्र सरकारमध्ये ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री आहेत.
हे ही वाचा:
ज्याची भीती होती तेच घडू लागलं; प्रधानांच्या राजीनाम्याने ते बारगळलं!
‘विद्यार्थ्यांवर पेलेट गन वापरण्याची परवानगी अमित शाह यांनी दिली’
बिझनेस कन्सल्टंटवर ताज हॉटेलमध्ये बलात्कार करणारा बडा उद्योगपती अटकेत
मंत्रालयात इंटर्नशिपची सुवर्णसंधी
याशिवाय, ते आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (इंटरनॅशनल सोलार अलायन्स) चे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.
याआधी, धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिला. नीट पेपरफुटीप्रकरणी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीच्या जंतर मंतर येथे आंदोलन घेत ही मागणी केली. जवळपास ४९ दिवस आंदोलन चालल्यानंतर अखेर प्रधान यांनी राजीनामा दिला.
या सगळ्या आंदोलनादरम्यान पोलिसांचा लाठीचार्ज आणि नंतर पोलिसांवर हल्ले झाले. त्यात पोलिस जखमी झाले, पोलिसांच्या गाड्या फोडण्यात आल्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रधान यांचा राजीनामा घेण्यात आला आणि इतर मागण्याही पूर्ण करण्याचे आश्वासन सरकारकडून कॉक्रोच पार्टीला देण्यात आले.
