28.4 C
Mumbai
Wednesday, July 29, 2026
घरराजकारणजंतर मंतरवरुन परतणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना मारहाण

जंतर मंतरवरुन परतणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना मारहाण

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

Google News Follow

Related

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनानंतर आणखी एका वादग्रस्त घटनेने राजकीय वातावरण तापले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये भाजपशी संबंधित असल्याचा दावा करण्यात येणारे सत्यम पंडित दोन विद्यार्थ्यांना मारहाण करताना दिसत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात असून विरोधी पक्षांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काही माध्यमांनी आणि विरोधी नेत्यांनी त्यांचा भाजपशी संबंध असल्याचा दावा केला आहे, मात्र त्यांच्या अधिकृत पक्षपदाबाबत स्पष्ट अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

माहितीनुसार, जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनातून परतणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना रस्त्यात अडवून त्यांच्या आंदोलनातील सहभागाबाबत विचारणा करण्यात आली. त्यानंतर वाद वाढला आणि विद्यार्थ्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी विविध विद्यार्थी संघटना आणि विरोधी पक्षांकडून केली जात आहे.
हे ही वाचा:
आता पंजाबच्या शिक्षणमंत्र्याचा हवाय राजीनामा!

अभिजितने राजकारण नव्हे, करिअरकडे लक्ष द्यावं!

बेंगळुरूत झुकलेली १८ मजली इमारत पाडणार… प्रत्येक फ्लॅटची किंमत दीड कोटी

चीनच्या विक्रमी सोनेखरेदीने बदललं जागतिक बाजाराचं गणित

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत भाजपवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याऐवजी त्यांच्यावर हल्ले होत असतील, तर ही लोकशाहीसाठी धोक्याची बाब असल्याचे त्यांनी म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही या घटनेचा निषेध करत विद्यार्थ्यांवर हात उगारणाऱ्यांविरुद्ध तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

दरम्यान, दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनामुळे आधीच राजकीय वातावरण तापलेले असताना या व्हिडिओने वादाला आणखी हवा मिळाली आहे. सोशल मीडियावर या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित मारहाणीचा निषेध केला जात आहे. संबंधित व्हिडिओ आणि आरोपांची चौकशी सुरू असून अधिकृत तपासानंतरच संपूर्ण सत्य स्पष्ट होणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
324,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा