28.8 C
Mumbai
Sunday, July 26, 2026
घरराजकारणकेंद्रीय शिक्षणमंत्री म्हणून प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला पदभार

केंद्रीय शिक्षणमंत्री म्हणून प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला पदभार

मंत्रालयाच्या प्रमुख योजनांचा घेतला आढावा

Google News Follow

Related

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी रविवारी नवी दिल्लीतील कर्तव्य भवन येथे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा अधिकृत पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी मंत्रालयाच्या विविध प्रमुख योजना आणि उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

प्रल्हाद जोशी यांच्याकडे यापूर्वीपासून ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचा कार्यभार आहे. आता त्यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी म्हणून शिक्षण मंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली आहे.

या बैठकीला केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी, उच्च शिक्षण विभागाचे सचिव डॉ. विनीत जोशी, शालेय शिक्षण व साक्षरता विभागाचे सचिव टी. के. अनिल कुमार तसेच शिक्षण मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

धर्मेंद्र प्रधान यांच्या जागी प्रल्हाद जोशी

शनिवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तत्काळ प्रभावाने स्वीकारला. त्यानंतर पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली.

राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, भारतीय संविधानाच्या कलम 75(2) अंतर्गत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला असून, पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार प्रल्हाद जोशी यांना त्यांच्या विद्यमान खात्यांसह शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

हे ही वाचा:

आता पंजाबच्या शिक्षणमंत्र्याचा हवाय राजीनामा!

नेपाळचा नवा एक रुपयाचा नाणे वादाच्या भोवऱ्यात

पदापेक्षा राष्ट्र सर्वोच्च’; अमित शाह यांची प्रतिक्रिया

रशिया-युक्रेन संघर्ष पुन्हा भडकला

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर कॉक्रोचने आंदोलन मागे घेतले

दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेले आपले आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्यासोबत झालेल्या तिसऱ्या फेरीतील चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी ही आंदोलनकर्त्यांची “अपरिवर्तनीय” मागणी असल्याचे कॉक्रोच जनता पार्टीने यापूर्वी स्पष्ट केले होते. सरकारने ही प्रमुख मागणी मान्य करून उर्वरित मुद्द्यांवरही सकारात्मक कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन “सद्भावनेतून” मागे घेत असल्याचे कॉक्रोच पार्टीने जाहीर केले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
323,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा